|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » भाजपमध्ये येण्यासाठी आजून खूप लोक रांगेत आहेत : मुख्यमंत्री

भाजपमध्ये येण्यासाठी आजून खूप लोक रांगेत आहेत : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली. अजून खूप लोक रांगेत आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. समाजातील विविध क्षेत्रांतील चांगल्या लोकांना भाजपात काम करण्याची संधी मिळते. एक चांगला कार्यकर्ता म्हणून निरंजन डावखरेंना भाजपामध्ये प्रवेश दिला.

 

निरंजन डावखरे यांचं भाजपामध्ये स्वागत करतो. ते पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून येतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. अजून खूप लोक रांगेत आहेत. आताच काही सांगणार नाही, पण वेळ आल्यावर तुम्हाला कळेल, असं देवेंद्र फडणवीस उपस्थित पत्रकारांना उद्देशून म्हणाले आहेत. विशेष म्हणजे निरंजन डावखरे यांना भाजपा कार्यालयापर्यंत आज राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील सोडायला आले होते. त्यामुळे निरंजन डावखरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

Related posts: