|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजपने विधानसभा अधिवेशन बोलावण्याचे धाडस करावे

भाजपने विधानसभा अधिवेशन बोलावण्याचे धाडस करावे 

प्रतिनिधी /मडगाव :

गोव्यात सद्या सरकारच अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी पडल्याने प्रशासन ठप्प झाले आहे. मंत्री मंडळाच्या बैठका होत नाही. त्यामुळे विकास कामे रखडली आहेत. काँग्रेसने राज्यपालाची भेट घेतल्याने, भाजपवाले टीका करतात, जर त्यांना धाडस आहे. तर त्यांनी विधानसभा अधिवेशन बोलवावे असे आव्हान काँग्रेस पक्षा तर्फे मडगावात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आले.

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील आव्हान दिले. ‘नमन तुका गोंयकारा’ या अभियानाअंतर्गत काँग्रेस पक्ष जनतेच्या समस्या ऐकून घेत आहे. या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्या सरकार दरबारी मांडून सोडविण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

गोव्यात सद्या सरकार नाही, मुख्यमंत्री नाही, मुख्य सचिव नाही व जिल्हाधिकारी नाही, मंत्री मंडळाच्या बैठका होत नाही असा आरोप श्री. बुयांव यांनी यावेळी केला. काँग्रेस पक्षाने ‘नमन तुका गोंयकारा’ हा उपक्रम पहिल्यादाच केलेला नाही. या पूर्वी गिरीश चोडणकर यांनी पदयात्रा केली, राज्यात काँग्रेसचे सरकार असताना प्रेरणा यात्रा केली, स्वातंत्र्याला 50 वर्षे झाली त्यावेळी यात्रा केली, भाजप सरकारच्या यु टर्नवर जागृती केली, 2016 मध्ये जनजागृती यात्रा केली व त्यातूनच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजप पेक्षा जास्त जागा मिळाल्या. तरी भाजपचे माजी आमदार सुभाष फळदेसाई स्टंट केल्याचा आरोप करतात, तो आरोप निराधार आहे.

भाजपचे प्रवक्ते सुभाष फळदेसाई यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, आमदार सुभाष फळदेसाई, दामू नाईक गणेश गांवकर यांना कोणी पाडले, त्याचा अगोदर अभ्यास करावा. पक्ष आदेश देतो म्हणून पत्रकार परिषदा घेण्याच्या भानगडीत पडू नये असा सल्ला दिला.

Related posts: