|Saturday, June 23, 2018
You are here: Home » Top News » पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या संपत्तीत 42 टक्के वाढ

पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या संपत्तीत 42 टक्के वाढ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नरेंद्र मोदी सरकारला 26 मे 2018 रोजी स्वतःच्या चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. जनतेनं मोदींना भारताचे पंतप्रधान बनण्याचीही संधी दिली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचा चार वर्षांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. या चार वर्षांच्या कार्यकाळात मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचेही अच्छे दिन आले आहेत. मोदी सरकार हे सामान्यांचं सरकार असल्याचंही मोदींच्या मंत्रिमंडळातील नेते नेहमीच दावा करत असतात. परंतु खरंच मोदी सरकार हे सामान्यांचं सरकार राहिलं आहे का, मोदींच्या मंत्रिमंडळातील कोट्यधीश मंत्र्यांच्या संपत्तीची माहिती पाहून तुमचे डोळे विस्फारतील. लोकसभा निवडणूक 2014नंतर मोदी सरकारमधल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या संपत्तीत मोठय़ प्रमाणात वाढ झाल्याचं उघडकीस आलं आहे.

 

नॅशनल इलेक्शन वॉच(एनईडब्लू) आणि असोसिएशन फॉर डेमोपेटिक रिफॉर्म 2016च्या एका रिपोर्टनुसार, मोदी मंत्रिमंडळातील 78 पैकी 72 मंत्री कोट्यधीश आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत 2014 पासून 2017पर्यंत जवळपास 41.8 टक्के(1.41 कोटी ते 2 कोटी रुपये) वाढ झाली आहे. सांख्यकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री सदानंद गौडा यांच्या संपत्तीत 42.3 टक्के(4.65 कोटी रुपयांहून 6.62 कोटी रुपये) वाढ नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या संपत्तीत 2015-17 या कार्यकाळात अधिक वृद्धी झाल्याचं समोर आलं आहे. 2015-17दरम्यान तोमर यांच्या संपत्तीत 67.5 टक्के(2014-15मध्ये 53 लाखांहून अधिक संपत्ती वाढून 2016-17मध्ये 89 लाख )वाढ झाली. तर मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची संपत्ती कमी झाल्याचं उघड झालंय. जावडेकर यांची संपत्ती 50 टक्क्मयां(1.11कोटी रुपयांवरून 56 लाख रुपयां)वर आली आहे.

 

 

 

 

Related posts: