|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विजय पुसाळकर यांचा पंच्याहत्तरीनिमित्त सन्मान

विजय पुसाळकर यांचा पंच्याहत्तरीनिमित्त सन्मान 

पुण्यातील पीवायसीत किरण ठाकुर यांच्या हस्ते सत्कार

पुणे / प्रतिनिधी

इंडोशॉटले प्रा. लि.चे अध्यक्ष विजय ऊर्फ बंडोपंत पुसाळकर यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. पुसाळकर यांनी नुकताच वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केला. त्यानिमित्त येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना येथे हा सन्मान करण्यात आला. यावेळी प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, सकाळचे संचालक प्रताप पवार, सुमनताई किर्लोस्कर, पुसाळकर यांच्या पत्नी तनुजा पुसाळकर, ज्येष्ठ बंधू प्रभाकर पुसाळकर, त्यांच्या पत्नी सिंधू पुसाळकर, मंजिरी नाईक, पूजा क्षत्रिय यांच्यासह कारखानदार व मित्रमंडळी उपस्थित होती.

बेळगावातील औद्योगिक क्षेत्राचा पाया घालणारे बाबुराव पुसाळकर यांचे विजय पुसाळकर हे चिरंजीव आहेत. त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. आत्तापर्यंतची कारकीर्द वेगवान व गतिशील असली, तरी यापुढे सावकाश खेळण्याचा सल्ला आपल्याला माधव आपटे यांनी दिला आहे. हा सल्ला आपण मानला असल्याच्या भावना यावेळी विजय पुसाळकर यांनी व्यक्त केल्या.

Related posts: