|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केएलईची मनमानी शुल्कवाढ थांबवा

केएलईची मनमानी शुल्कवाढ थांबवा 

वार्ताहर/ निपाणी

पाल्यांना उच्च दर्जाचे, चांगल्या व्यवस्थापनाखाली, भविष्य घडविणारे शिक्षण मिळावे यासाठी केएलई संस्थेच्या इंग्रजी व सीबीएसई शाळेत दाखल केले. पण ही संस्था प्रतीवर्षी शैक्षणिक शुल्क वाढवून पालकांची आर्थिक लूट करत आहे. मनमानी पद्धतीने वाढवले जाणारे हे शुल्क कोणाही पालकाला परवडणारे नाही. यासाठी शासनाच्या निर्देशानुसार शुल्क आकारणीचे शिक्षण खात्याने संबंधित संस्थेला आदेश द्यावेत व वाढविलेले शुल्क थांबवावे, अशा आशयाचे निवेदन शुक्रवारी सुमारे 400 पालकांनी गटशिक्षणाधिकारी के. रामनगौडा यांच्यासह संबंधित संस्था, शाळांना दिले.

शिक्षणाच्या नावाखाली वाढविलेले शुल्क एक आर्थिक समस्या बनून पालकांसमोर उभी ठाकल्sढ असताना अनेक पालक संघटित विरोध करण्यासाठी दुर्लक्ष करत होते. गेल्या अनेक वर्षांपासून मनमानी शुल्क वाढवत आर्थिक लूट सुरू आहे. यासाठी यंदा पालकांनी जागृत होऊन या शुल्कवाढीविरोधात संघटित आवाज उठविला आहे.

प्रवेश शुल्कासह वर्षभरात गणवेश, पाठय़पुस्तके, वहय़ा, स्नेहसंमेलन यासह इतर कारणांसाठी शुल्क आकारणी केली जाते. यामुळे पालकांचे आर्थिक नियोजन चुकत आहे. याकडे शिक्षण खात्याने लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

निवेदन देताना नियाज देसाई, अरविंद चेचर, चंद्रसेन घोरपडे, समिर बागवान, अंकुर शहा, कन्हैया राठोड, विनायक महाजन, विश्वनाथ उमदी, जुई सांगावकर, अंजना खोत, स्नेहा मेहता, दीपाली खोत, गीता पाटील, निता पठाडे यांच्यासह पालक उपस्थित होते.

Related posts: