|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पीकेपीएसतर्फे नुकसान भरपाईची रक्कम हडप

पीकेपीएसतर्फे नुकसान भरपाईची रक्कम हडप 

वार्ताहर/   कणगले

मसोबा हिटणी (ता. हुक्केरी) येथील पीकेपीएसने पीक नुकसान भरपाईची आलेली रक्कम सचिव व संबंधितांनी बनावट सहय़ा करुन हडप केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्ते मोहन जाधव यांनी केला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना जाधव म्हणाले, 2012-13 व 2013-14 काळातील पीक नुकसान भरपाईचा धनादेश येथील पीकेपीएसला जमा झाला आहे. नुकसानग्रस्त अन्य ठिकाणी गेल्याचे कारण पुढे करत सचिव व कार्यकारिणीच्या मंडळीने बनावट सहय़ा करुन 64 हजार 885 रुपये हडप केले आहेत. ही माहिती आरटीआय अंतर्गत उघडकीस आणली आहे.

संघाचे सचिव महादेव पाटील काही शेतकऱयांना नुकसान भरपाईचा धनादेश देत होते. त्यावेळी आपणास मंजूर रक्कम व देय रक्कमेत तफावत झाल्याचे कळाले. त्यामुळे आपण हुक्केरी तहसीलदारकडे माहिती हक्क अर्जाद्वारे 19 सप्टेंबर 2016 रोजी पत्रव्यवहार केला. त्याचे उत्तर मिळाले नाही. यामुळे त्यांनी 1 नोव्हेंबर 2016 रोजी उप-जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली.

त्यानंतर राज्य माहिती आयोगाने जिल्हाधिकारी यांच्याबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे माहिती द्यावी, असे सांगून तहसीलदारास चौकशीचे आदेश दिले. 3 जानेवारी 2018 व 19 जानेवारी 2018 मध्ये 64 हजार 885 रुपये ऍक्सीस बँकेत सचिव महादेव पाटील यांनी रक्कम भरणा केल्याची माहिती पुढे आली. शिवाय भरणा करण्यात आलेली रक्कम अपुरी असून उर्वरित रक्कमही खात्यावर जमा करण्यासाठी पाठपुरावा केल्याची माहिती समोर आली आहे.

जुन्या कार्यकारणीशी कोणताही संबंध नाही

2012 ते 14 सालात नुकसान भरपाई धनादेश देण्यात आले आहेत. त्यात सदर भ्रष्टाचार झाला असेल. पण सदर प्रकाराचा 2018-19 सालाच्या कार्यकारिणीचा कोणताही संबध नसल्याचे पीकेपीएस अध्यक्ष लक्ष्मण नाईक यांनी सांगितले.

Related posts: