|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » सलग तेराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महाग

सलग तेराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महाग 

ऑनलाईन टीम  /श्रीनगर

इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारवर टीका होत असताना आज सलग तेराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलिटर 13 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 16 पैशांनी महागलं आहे.

मुंबईत आज पेट्रोल 85 रुपये 78 पैशांनी मिळत आहे. तर डिझेलचे दर 73 रुपये 34 पैसे आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 77 रुपये 96 पैशांवर पोहोचला आहे.पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. परंतु दरांवर नियंत्रण आणण्यात सरकारला आतापर्यंत यश आलेलं नाही.

दुसरीकडे देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. अधिक स्पष्ट करायचं झालं तर अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे.अमरावतीतील पेट्रोलच्या दराने 87 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अमरावतीमध्ये आजचा दर 87.11 रुपये तर डिझेल 74.79 रुपये आहे.