|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » फासकीत अडकलेल्या बिबटय़ाची मुक्तता

फासकीत अडकलेल्या बिबटय़ाची मुक्तता 

लांजा तालुक्यातील वाघ्रट रांबाडेवाडीतील घटना

प्रतिनिधी /लांजा

लांजा तालुक्यातील वाघ्रट रांबाडेवाडी येथील एका काजुच्या बागेत फासकीमद्ये अडकलेल्या बिबटय़ाला वनविभागाने सुरक्षित पकडून बिबटय़ाला वन अधिवासात सोडले. ही घटना शनिवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यानं उघडकीस आली.

तालुक्यातील वाघ्रट रांबाडेवाडी येथे सुरेश बाळू रांबाडे यांची काजूची बाग आहे. शनिवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्याने रांबाडे आपल्या काजूच्या बागेत गेले असता त्यांना बिबटय़ा फासकीत अडकला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गावातील ग्रामस्थ सुदाम कामत यांना या प्रकाराची माहिती दिली असता कामत यानी लांजा वनविभागाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी, सामाजिक वनिकरणचे बोराडे, लांजा वनपाल व्ही. वाय. गुरवळ, वनरक्षक विक्रम कुंभार, वनरक्षक राहुल गुंठे, वनरक्षक रत्नागिरी एन.एस गावडे, निसर्ग मित्र सागर वायंगणकर हे घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या अथक प्रयत्नानंत्तर बिबटय़ाला पकडण्यात वनविभागाला यश आले.

बिबटय़ा दोन ते अडीच वर्षांचा असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. बिबटय़ाला पकडून त्याला वनअधिवासात सोडून देण्यात आले.