|Friday, March 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » शहर-गाव यांच्यातला दुरावा कमी करणारी लक्ष्मी सदैव मंगलम्

शहर-गाव यांच्यातला दुरावा कमी करणारी लक्ष्मी सदैव मंगलम् 

एका सामान्य घरातून आलेली मुलगी जी निसर्गाने सजवलेल्या गावात वाढली, हिरव्यागार रानात रमली, नदी काठावर खेळली, शुभ पावलांनी गावात आली आणि सगळय़ांची लाडकी बनली. पण, जिचा हात तिच्या आईने ती लहान असताना सोडला आणि देवाघरी गेली अशी लक्ष्मी त्याक्षणीच पोरकी झाली. आईच्या नसण्यामुळे लक्ष्मीचं संपूर्ण भावविश्वच बदलून गेलं. परंतु, या परिस्थितीत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती तिची आजी. लक्ष्मीची आजी तिला लहानपणापासून सांगत असे की, तुझ्या स्वप्नातला राजकुमार नक्की येईल आणि तुझं आयुष्य प्रेमाने बहरून टाकेल. तेव्हापासून लक्ष्मी त्या राजकुमाराची स्वप्न पाहते आहे. जशी प्रत्येक मुलीची इच्छा असते की, तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळावा… यावर भाष्य करणारी लक्ष्मी सदैव मंगलम् ही मालिका नुकतीच कलर्स मराठीवर सुरू झाली आहे.

 आपल्याला आधार देणारा, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात असावा अशी इच्छा लक्ष्मीची देखील आहे. लक्ष्मीला तिचा राजकुमार मिळेल का? लक्ष्मी जसं तिच्या घरातल्यांवर नि:स्वार्थीपणे प्रेम करते तिला असं नि:स्वार्थी प्रेम कधी मिळेल का? तर दुसरीकडे मल्हार आणि आरवी हे जोडपं आहे ज्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. हे दोघेही लवकरच लग्नाच्या पवित्र बंधनामध्ये अडकणार आहेत. जेव्हा दुसऱयांवर नि:स्वार्थपणे प्रेम करणारी लक्ष्मी आणि एकमेकांवर नि:स्वार्थी प्रेम करणारे मल्हार आणि आरवी भेटतील तेव्हा काय होईल? या प्रश्नांची उत्तरे ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ या मालिकेत मिळणार आहेत. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता ही मालिका प्रसारित होते. सुरभी हांडे मालिकेमध्ये आरवीची भूमिका तर ओमप्रकाश शिंदे मल्हार आणि निवोदित समफद्धी केळकर ही लक्ष्मीची भूमिका साकारत आहे.

आपल्या नव्या मालिकेबद्दल बोलताना दिग्दर्शक राकेश सारंग म्हणाले, ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ ही मालिका शहर आणि गावं यांच्यातला दुरावा कमी करणारी मालिका आहे. शहरातल्या धुसमळत्या प्रेमाला अस्सल ग्रामीण प्रेमाने रंगवणाऱया या मालिकेमध्ये आम्ही अतिशय निरागस आणि अवखळ अशा लक्ष्मीचा प्रवास दाखवणार आहोत. मालिकेमध्ये अनुभवी कलाकारांचा संच आणि अनोखी संकल्पना असल्यामुळे ही मालिका नक्कीच प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री वाटते.

 

Related posts: