|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारत-श्रीलंकेशी संबंधित फायली केल्या नष्ट

भारत-श्रीलंकेशी संबंधित फायली केल्या नष्ट 

लंडन :

युनायटेड फॉरेन अँड कॉमनवेल्थ ऑफिस म्हणजेच एफसीओने सुमारे 195 फायली नष्ट केल्या आहेत. या फायलींमध्ये लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमच्या (एलटीटीई) नेतृत्वाखालील गृहयुद्धादरम्यान श्रीलंका आणि भारत यांच्यातील संबंधांचा तपशील नमूद होता. ब्रिटनच्या या कृतीमुळे संशोधक आणि इतिहासकारांमध्ये चिंता पसरली आहे. नोंद विषयक धोरणाच्या आधारावर फायली नष्ट करण्याचा निर्णय घेतला जातो असा दावा एफसीओने केला. तर फायली नष्ट केल्याने इतिहासातील महत्त्वपूर्ण कालखंडाची कोणतीही नोंद शिल्लक राहणार नसल्याचा आरोप तज्ञांनी केला. 1978 ते 1980 दरम्यान एलटीटीई संकटादरम्यान ब्रिटनच्या एमआय 5 आणि सिक्रेट एअर सर्व्हिसने श्रीलंकेच्या सुरक्षा दलांना मार्गदर्शन केल्याचे मानले जाते.

असा झाला खुलासा

पत्रकार आणि संशोधक फिल मिलर यांनी ‘फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट’कडून माहिती मागविली असता या फायली गायब असल्याचे उघड झाले. नष्ट करण्यात आलेल्या दस्तऐवजांपैकी दोघांच नावे ‘श्रीलंका/इंडिया रिलेशन्स’ होती आणि हे दस्तऐवज 1979-1980 या कालखंडातील होते असे मिलर यांनी सांगितले. या दस्तऐवजांमध्ये श्रीलंका-भारत संबंधांची माहिती नमूद असल्याचे मानले जाते. भारताच्या शांतता सैन्याच्या कामाशी निगडित माहिती त्यात असण्याची शक्यता आहे.

नॅशकल अकॉईव्जमधील ऐतिहासिक नोंदी हटविणे किंवा त्या नष्ट करणे बेकायदेशीर कृत्य असून यामुळे आम्हा सर्वांना दुःख पोहोचले आहे. विदेश कार्यालयाने हे पाऊल श्रीलंकेच्या सुरक्षा दलांना मार्गदर्शन करण्यासंबंधी एसएएस आणि एमआय 5 ची भूमिका लपवून ठेवण्यासाठी उचलण्यात आल्याचे वाटते. ही माहिती समोर आली असता सरकारची कोंडी झाली असती असा दावा तमिळ इन्फॉर्मेशन सेंटरचे संस्थापक वैरामुत्तू वरदकुमार यांनी केला.

Related posts: