|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रधानसचिवांनी अधिकाऱयांचे घेतले हसतखेळत लेकचर

प्रधानसचिवांनी अधिकाऱयांचे घेतले हसतखेळत लेकचर 

प्रतिनिधी/ सातारा

अंगणवाडीमध्ये बालकाचा ज्ञानचक्षू वाढत असतो. ग्रहण करण्याची क्षमता जास्त असते. श्रीमंत घरातील मुलं कधीही शाळा बुडवत नसतात. परंतु गरीबांची मुलं शाळा बुडवतात. याला कारणेही तशीच असतात. सर्वसामान्य पालकांमध्ये प्रबोधन करणे गरजेचे असते. अंगणवाडीच्या कार्यकर्त्यांनी बाळ हत्ती न होता काम निष्ठेने केल्यास सध्या सातारा जिह्यात महाबळेश्वर, पाटण, कराड या तीन तालुक्यात जे चित्र आहे ते निश्चित पालटेल, अशी खंत राज्याचे प्रधानसचिव नंदकुमार यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी डॉ. सुनील मगर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नंदकुमार म्हणाले, बालकाचा ज्ञानतंतू हा लहानवयातच वाढत असतो. त्याच वयात ते शिकते. अंगणवाडीतच बालकांवर शिक्षणाच्या पद्धतीमध्ये लक्ष घातले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात नक्की काय चालते याचा निट अंदाज येत नाही. पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कार्यक्रम राबवला पाहिजे. पालघर जिह्यातील वाढा तालुक्यात शर्मिली पाटील नावाची शिक्षकेने प्रभावीपणे राबवले आहे. आदिवासी भागातील मुले शाळेत का येत नाही. त्याची कारणे शोधून ती शाळेत आली पाहिजे. शिकली पाहिजेत. हे महाबळेश्वर, पाटण, कराड या तालुक्यात होताना दिसत नाही. मुलाला ज्ञान प्राप्ती होताना दिसत नाही. पालकांचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.

ज्ञानरचना वादाचे केले कौतुक

ज्ञानरचना वाद हा वेगळा उपक्रम आहे. प्रत्येक माणूस हा ज्ञान रचना करत राहतो. तुमची प्रतिभा संपन्न वाढे हे पुस्तक दोनशे पानाचे आहे. त्याचा दाखला देत साताऱयातील ज्ञानरचना वादाचे कौतुक त्यांनी केले.