|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भव्य ‘हिंदू एकता दिंडीने’ डॉ. जयंत आठवले यांना कृतज्ञता अर्पण

भव्य ‘हिंदू एकता दिंडीने’ डॉ. जयंत आठवले यांना कृतज्ञता अर्पण 

प्रतिनिधी / बेळगाव

 शिवकालीन मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, रणरागिणींचे पथक, हिंदू राष्ट्रावर आधारित चित्ररथ, भगवे ध्वज, विविध मर्दानी खेळ आणि हिंदू राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत मनाशी बाळगून काढण्यात आलेल्या भव्य ‘हिंदू एकता दिंडे’ने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना कृतज्ञता अर्पण करण्यात आली. हिंदू राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी हिंदू राष्ट्र जागृती अभियानांतर्गत शहरात भव्य हिंदू एकता दिंडी काढण्यात आली होती. नाथ पै सर्कल, शहापूर येथून या दिंडीची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी योग वेदांत समितीचे सदस्य अमर चौधरी यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 28 एप्रिलपासून दि. 28 मेपर्यंत महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून रविवारी ही भव्य दिंडी काढण्यात आली. या दिंडीत सजविलेल्या रथात डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा, शक्तीदेवता महालक्ष्मी देवीची पालखी, घोडेस्वार, झांजपथक, लेझीम पथक, कराटे आणि मल्लखांबची प्रात्यक्षिके दाखविणारी मुले-मुली तसेच स्वसंरक्षणासाठी करावा लागणारा प्रतिकार आदींची सादर करण्यात येत असलेली प्रात्यक्षिके पाहणाऱयांच्या अंगावर शहारे आणत होती.

दिंडीत बालगोपाळांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या शेतकऱयांच्या जीवनावरील देखावा, राष्ट्र आणि संत पुरूषांच्या वेशभुषेतील सहभागी मुले यांच्यासह स्वामी समर्थ संप्रदाय, हिंदू जनजागृती, सनातन संस्था, वारकरी संप्रदाय, शिवप्रति÷ान, बजरंग दल, श्रीराम सेना, योग वेदांत समिती आदींचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नाथ पै सर्कल, शहापूर येथून सुरू झालेली ही हिंदू एकता दिंडी खडेबाजार शहापूर, एसपीएम रोड मार्गे, कपिलेश्वर मंदिरापर्यंत आली. या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीचे ऋषीकेश गुर्जर, सनातनचे गुरूप्रकाश गौडा, योग वेदांत समितीचे गणेशभाई आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना हिंदू राष्ट्र स्थापनेची आवश्यकता, देशातील सध्या असणारी हिंदू धर्मियांची परिस्थिती या विषयांवर मार्गदर्शन केले. दिंडी मार्गावर नागरिकांनी या भव्य हिंदू एकता दिंडीचे जोरदार स्वागत केले. दिंडीत हिंदू एकजुटीचा विजय असो, यासह छत्रपती शिवाजी महाराज, कित्तूर राणी चन्नम्मा आदी महापुरुषांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात येत होत्या. मिरवणुकीच्या अग्रभागी धर्मध्वज आणि प्रज्वलित केलेली धर्मज्योत घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते..