|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » पतंजलीचे सिम कार्ड बाजारात येणार

पतंजलीचे सिम कार्ड बाजारात येणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रामदेव बाबांचा पतंजली दिवसेंदिवस प्रगतीची अनेक शिखरे गाठत आहे. पतंजलीच्या स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांना भारतीय ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. याचाच फायदा घेत रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगसमूहाने आता टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.

रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगसमूहाने रविवारी एक सिम कार्ड लाँच केले असून, त्याचे स्वदेशी समृद्धी सिम कार्डअसे नाव आहे. तसेच या नव्या सिम कार्डसाठी पतंजलीने बीएसएनएलशी करार केला आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि पतंजली यांनी संयुक्तपणे हे सिम कार्ड लाँच केले. विशेष म्हणजे सद्यस्थितीत हे सिम कार्ड फक्त पतंजली उद्योग समूहातील कर्मचाऱयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. 2 जी नेटवर्क असलेल्या या सिम कार्डवरून 144 रूपयांचे रिचार्ज केल्यास ग्राहकाला 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळणार आहे. तसेच या सिम कार्डवरून पतंजलीची उत्पादने मागवल्यास 10टक्के सूटही देण्यात येणार आहे.

पतंजली सिम कार्डवर फक्त 144 रूपयांचे रिचार्ज केल्यास अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. या 144 रूपयांच्या पॅकमध्येच 2जीबी डाटा आणि 100 एसएमएस सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. सिम कार्ड सध्या फक्त पतंजली कर्मचाऱयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. जेव्हा सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर या कार्डवरून पतंजलीची उत्पादन मागवल्यास 10 टक्के सूट दिली जाणार आहे. एवढेच नव्हे, तर या सिम कार्डच्या ग्राहकाला 2.5 लाख रूपयांपर्यंतचे मेडिकल लाइफ इन्शुरन्स आणि 5 लाख रूपयांपर्यंतचे लाइफ इन्शुरन्स उपलब्ध करून दिले जाणार आहे.