|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तामिळनाडूतील वादग्रस्त स्टरलाइटला कायमचे टाळे

तामिळनाडूतील वादग्रस्त स्टरलाइटला कायमचे टाळे 

ऑनलाईन टीम / तुतिकोरिन :

येथे वेदांत ग्रुपच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाविरोधात गेले महिनाभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर अखेर तामिळनाडू सरकारने प्रकल्पाला टाळे ठोकले आहे. प्रकल्पाविरोधात लोकांनी आंदोलन पुकारल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 13 जणांचा मृत्यू झाला. अखेर सामान्य नागरिकांच्या लढय़ाला यश मिळाले असून, सरकारने प्रकल्प कायमस्वरूपी बंद केला आहे.

तामिळनाडू सरकारने राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाला कॉपर प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. ‘हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद व्हावा अशी लोकांची मागणी आहे. लोकांची मागणी लक्षात घेता प्रकल्प कायमचा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मला स्पष्ट करायचे आहे की, स्टरलाइट प्रकल्प कायमचा बंद करत आहोत’, अशी माहिती उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी दिली आहे. स्टरलाइट प्रकल्पाविरोधात सामान्य लोक रस्त्यावर उतरले होते. 22 मे रोजी आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस फायरिंगमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता. दुसऱया दिवशी अजून एका जखमी तरूणाचा मृत्यू होऊन हा आकडा 13 वर पोहोचला आहे. तुतिकोरिन येथे वेदांत स्टरलाइट कॉपर प्रकल्प असून या प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी विस्तार केला जाणार होता. यासाठी काम देखील सुरू झाले होते. मागील 100 दिवसांपासून या प्रकल्पाविरोधात स्थानिक लढा देत होते. या प्रकल्पामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते. भूजल प्रदुषित होत असून यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे स्थानिकांनी म्हटले.

Related posts: