|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खासगी आराम बस अपघातात 16 जण जखमी

खासगी आराम बस अपघातात 16 जण जखमी 

मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटातील घटना

संरक्षक भिंतीमुळे बस दरीत कोसळता-कोसळता बचावली

आराम बसचे मोठे नुकसान, महामार्ग 3 तास ठप्प

प्रतिनिधी /लांजा

मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये भरधाव वेगात जाणारी खासगी आराम बस उलटून झालेल्या अपघातात 16 जण जखमी होण्याची घटना सोमवारी पहाटे 5़ 15 वाजण्याच्या दरम्यान घडल़ी या अपघाताची भीषणता एवढी होती की, बस उलटून 10 ते 15 फुट वेगात घसरत जाऊन रस्त्याच्या संरक्षक भिंतीला धडकल़ी त्यामुळे 50 फुट उंच दरीमध्ये बस कोसळता-कोसळता सुर्दैवाने वाचल्याने मोठा अनर्थ टळल़ा यामध्ये आराम बसचे मोठे नुकसान झाले आह़े

आराम बस अपघातात ऋषीकेश अरुण सुर्वे (29,ऱा परेल, मुंबई), पायल सिरोही (26, ऱा ठाणे, मुंबई), लक्षणा लखण ठेंबरे (28, कल्याण-मुंबई), पूर्णा चंद्रा शेट्टी (28,ऱा गोवा, मार्दल), जयंत तुकाराम राणे (52 ऱा कळवा-मुंबई), अमिंदरकुमार प्रकाश दळवी (29, ऱा परेल-मुंबई), अनिकेत शेखर आडविलकर (27,ऱा परेल-मुंबई), मकरंद कृष्णकांत पाटील (28, अलिबाग), हर्षल बाळकृष्ण जोशी (30, ऱा नवी मुंबई), नयना हर्षल जोशी (26 ऱा नवी मुंबई), सोनाली गणेश मडवी (24 ऱा नेरुळ, नवी मुंबई), आशिष प्रकाश विचारे (27 ऱा परेल- मुंबई), सिद्धेश प्रकाश विचारे (30 ऱा परेल-मुंबई), अमोल फकीर परब (40, ऱा बोरीवली-मुंबई), रेश्मा अमोल परब (36 ऱा बोरीवली-मुंबई), सिद्धेश सतीश जाधव (29 ऱा परेल-मुंबई) असे 16 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत़ जखमींवर लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना सोडण्यात आल़े

मुंबई-गोवा महामार्गावर घडलेल्या आराम बस अपघाताबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ए. के. बी. ट्रव्हल्सची आराम बस (एमएच-07, सी-9627) गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होत़ी बसमध्ये 30 प्रवासी हेत़े आराम बस पप्पू नासिर खान (45, ऱा मध्यप्रदेश जिल्हा भिंड, मानपूर) हा चालवत होत़ा यासह त्याचा सहकारी चालक सोबत होत़ा दरम्यान आराम बस 30 प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने जात असतानाच मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील वेरळ घाटाच्या तीव्र उतारावर सोमवारी पहाटे 5.15 वा.च्या दरम्यान आली. यावेळी भरधाव असणाऱया बसवरील चालक पप्पू खान याचा ताबा सुटला. त्यामुळे बस महामार्गाच्या डाव्या बाजूला असणाऱया लोखंडी संरक्षक भिंतीवर जाऊन जोरदार धडकल़ी बसची धडक एवढी जबर होती की, बस उलटून उतारावरच्या दिशेने 10 ते 15 फुट घसरत गेली व संरक्षक भिंतीवर जाउढन थांबल़ी बस उलटल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोकाच चुकला होत़ा बस संरक्षक भिंतीला अडकल्याने बसचा अर्धा भाग दरीकडे झुकला होता. तर मागील भाग गटारामध्ये राहिला होत़ा लोखंडी संरक्षक भिंत असल्याने सुर्दैवाने बस दरीत कोसळता-कोसळता बचावली आणि जीवितहानी टळल़ी मात्र यात 16 प्रवासी किरकोळ जखमी झाल़े

या अपघाताची खबर मिळताच लांजा पोलीस स्थानकाचे पंडित पाटील, संतोष झापडेकर, सुरेश शिरगावकर, सुनील चवेकर, पांडुरंग किल्लर, धनाजी सुतार, राजेश पवार, संजय मूरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केल़े उपचार केल्यानंतर जखमींना सोडून देण्यात आल़े या अपघाताची माहिती मिळताच देवधे, वेरळ व लांजा शहरातील युवकांनी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

महामार्ग 3 तास ठप्प

कलंडलेली आराम बस क्रेनच्या सहाय्याने काढताना मुंबई-गोवा महामार्ग 3 तास ठप्प झाला होत़ा त्यामुळे वाहनांच्या रांगांच-रांगा महामार्गावर लागल्या होत्य़ा 3 तासानंतर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आल़ी

..अन् प्रवाशांचा जीव पडला भांडय़ात

मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाट हा डेंजर झोन ठरत असून महामार्गाच्या रंदीकरणात हा डेंजर झोन कालबाह्य होणार आह़े या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाताना घाटाचा तीव्र उतार असून डाव्या बाजूला खोल दरी आह़े दरीपासून संरक्षण व्हावे, यासाठी संरक्षक भिंत उभारुन चालकांना संरक्षण दिले गेले आह़े याच भिंतीला ए. के. बी. ट्रव्हल्सची आराम बस धडकून थांबली व खोल दरीत कोसळता-कोसळता बचावली आणि प्रवाशांचा जीव भांडय़ात पडल़ा संरक्षक भिंत नसती तर मोठा अनर्थ घडला असत़ा

ब्रेक न लागल्याने चालकाचा सुटला ताबा

पहाटे पावसाच्या हलक्या सरी पडल्याने महामार्गावर पाणी पडून महामार्ग निसरडा बनला होत़ा उतार असल्याने बसचा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता ब्रेक न लागल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस संरक्षक भिंतीवर धडकल्याचे चालकाने सांगितले.