|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तटरक्षक दलाच्या गोवा विभाग उपमहासंचालकपदी हिमांशू नौटीयाल

तटरक्षक दलाच्या गोवा विभाग उपमहासंचालकपदी हिमांशू नौटीयाल 

प्रतिनिधी/ वास्को

भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा विभागाचे उपमहांचालक म्हणून उपमहासंचालक हिमांशू नौटीयाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमहासंचालक मनोज वसंत बाडकर यांना महासंचालक म्हणून बढती मिळालेले असून त्यांची नियुक्ती नवी दिल्लीतील भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात करण्यात आलेली आहे.  बाडकर यांनी नुकताच उपमहासंचालक पदाचा ताबा नौटीयाल यांच्याकडे दिला.

उपमहासंचालक हिमांशू नौटियाल यांनी जीओलॉजी पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असून ते विशेष सैन्यदलाचे अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यकिर्दीत त्यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या सर्व प्रकारच्या अत्त्याधुनिक जहाज व अपतटीय गस्ती जहाज तसेच एअर कुशन जहाजांवर सेवा बजावली आहे. त्यांनी आतापर्यंत भारतीय तटरक्षक दलाच्या उत्तर पश्चिम विभागामध्ये चीफ स्टाफ ऑफिसर व नवी-दिल्ली येथील तटरक्षक दलाच्या मुख्यालयात सहाय्यक संचालकांची जबाबदारी सांभाळालेली आहे.

Related posts: