|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ,51जण ताब्यात

अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ,51जण ताब्यात 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

अहमदनगरच्या चोंडीत पुण्यश्लो अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी 51 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

चौंडीतील अहिल्याबाई होळकर जयंती उत्सवात गुरूवारी घोषणाबाजी, खुर्च्यांची फेकाफेक तसेच पोलिसांवर मोठय़ा प्रमाणात दगडफेक झाली. या दगफेकीत संदीप पवार नावाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस गंभीर झाले आहेत. या प्रकरणात डॉक्टर इंद्रकुमार भिसे आणि सुरेश कांबळे यांच्यासह 100 ते150 कार्यकर्त्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.