|Monday, November 12, 2018
You are here: Home » Top News » शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर हल्ला

शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर हल्ला 

ऑनलाईन टीम / अंबरनाथ :

शिवसेना नगरसेविका रेश्मा काळे यांचे पती अजित काळे यांच्यावर जिवघेना हल्ला करण्यात आला. ही घटना काल अंबरनाथ येथे घडली आहे. या हल्ल्यात काळे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रभाग 37 मध्ये रस्ता रूंदीकरण होणार असून त्यात अनेक दुकाने तुटणार आहेत. त्यातूनच हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरूवारी सायंकाळी छोटू काळे यांचा कार्यकर्ता तेजा यादवला मोतीराम पार्क भागात मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याने छोटू काळे यांनी तिथे जाऊन विचारपूस केली. याचवेळी तिथे आलेल्या विनोद माने आणि प्रवीण माने यांनी छोटू काळे यांना धक्काबुक्की करत त्यांच्या डोक्मयात रॉडने मारहाण केली. यात काळे जखमी झाले असून त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Related posts: