|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Automobiles » रॉयल एनफिल्डची नवी बाईक ; 10जुलैपासुन बुकिंग सुरू

रॉयल एनफिल्डची नवी बाईक ; 10जुलैपासुन बुकिंग सुरू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रॉयल एनफिल्डची नवी बाईक बाजारात दाखल होणार असून क्लासिक 500 बुलेट असे या बाईकचे नाव आहे. या बाईकचे बुकिंग 10 जुलैपासून सुरू होणार आहे. रॉयल एनफिल्डची पोगारस मॉडेल दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. या बाईकची किंमत दोन लाखांच्या घरात आहे.

रॉयल एनफिल्डने लॉन्च केलेल्या क्लासिक 500 बुलेटचे नाव पेगासस असे ठेवण्यात आले आहे. ही बुलेट दुसऱया महायुद्धात ब्रिटीश पॅराट्रूपर्सकडून वापरण्यात आलेल्या आरई/डब्ल्यूइ 125 बाइकवरुन प्रेरित आहे. या बाइकची फ्लाईंग फ्ली म्हणूनही ओळख आहे. दरम्यान, रॉयल एनफिल्डने लॉन्च केलेल्या क्लासिक 500 बुलेटची किंमत जाहीर करण्यात आली आहे. भारतात या बुलेटची किंमत 2.49 लाख ( महाराष्ट्रात ऑन रोड) आणि 2.40 लाख ( दिल्लीत ऑन रोड ) अशी असणार आहे. या बुलेटची ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. 10 जुलैपासून ही बुकिंग सुरु होईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

Related posts: