|Friday, July 19, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

कर्कराशीत शुक्र प्रवेश व सूर्य, बुध युती होत आहे. तुमच्या बुद्धिचातुर्यामुळे कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाता येईल. चौकस विचार करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या मदतीची गरज सर्वांना भासेल. सप्ताहाच्या शेवटी एखादी घटना मनाविरुद्ध घडू शकते. धंद्यात सुधारणा होईल. थोरा-मोठय़ांचा सहवासाने रेंगाळत राहिलेली कामे करून घ्या. शेतकरी वर्गाला नव्या शेतीचा फायदा होईल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल.


वृषभ

कर्क राशीत शुक्राचे राश्यांतर व चंद्र, मंगळ युती होत आहे. डळमळीत झालेला  आत्मविश्वास नव्याने परत मिळेल. महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ व सहकारी यांचा उपयोग होईल. संघर्ष संपलेला नाही. घरातील वाद मिटवता येईल. संसारात पती पत्नी दोघांची तयारी त्यासाठी असावी लागते. धंदा टिकवता येईल. थकबाकी वसूल करा. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल.


मिथुन

आठवडय़ाच्या सुरुवातीला वादविवाद वाढेल. प्रवासात सावध रहा. वाहनापासून त्रास होऊ शकतो. कर्क राशीत शुक्र प्रवेश व चंद्र मंगळ युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय- सामाजिक कार्यात मतभेद टोकाला जाऊ शकतात. प्रवासात सावध रहा. दुखापत संभवते. घरात वाटाघाटीत वाद होईल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व घटना घडतील, असे समजू नका. सर्वच ठिकाणी तडजोड करावी लागेल. नोकरीत काम वाढेल. वरि÷ांच्या विरोधात जाणे त्रासदायक ठरेल. कला, क्रीडा क्षेत्रात उदास वाटेल.


कर्क

तुमच्याच राशीत शुक्राचे राश्यांतर व सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर घरात नाराजी होईल. खर्च वाढेल. पैशावरून आपसात वाद विकोपाला जाऊ शकतो. शांत डोक्मयाने विचार करा. राजकीय, सामाजिक कार्याला वेग देता येईल. तुमचा प्रभाव भाषणात दिसेल. मैत्रीत दुरावा येऊ शकतो. क्रीडा क्षेत्रात चमकाल. पराक्रम दाखवता येईल. जमिनी संबंधी काम करून घ्या. नोकरी मिळू शकेल.


सिंह

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग व कर्क राशीत शुक्र प्रवेश होत आहे. तुमचा राजकारणातील दमदार आवाज लोकांना प्रेरणादाई ठरू शकतो. या आठवडय़ात प्रति÷ा वाढेल. परंतु गुप्त कारवायांचा त्रास वाढेल. जवळचे लोक भलत्या अपेक्षा ठेवण्याची शक्मयता आहे. धंद्यात वाढ व सुधारणा करता येईल. थकबाकी वसूल करा. कला, क्रीडा क्षेत्रात आशादायक वातावरण राहिल. प्रसिद्धी मिळेल. लोकांच्या गरजा पूर्ण करण्याची जिद्द समाजकार्यात ठेवा.


कन्या

सूर्य, बुध युती व कर्केत शुक्र प्रवेश करीत आहे. महत्त्वाची कामे होतील. शेतकरी वर्गाला यावर्षात मनाप्रमाणे पीक काढता येईल व फायदा पण मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे काम कौतुकास्पद ठरेल. दर्जेदार लोकांच्या सहवासाने योजनेला व व्यवसायाला दिशा मिळेल. भागीदार गुंतवणूक करतील. घरात मंगळवारी, बुधवारी किरकोळ वाद होईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी व पैसा मिळेल. परीक्षेत यश मिळेल.


तुळ

चंद्र, मंगळ युती व कर्कराशीत शुक्राचे राश्यांतर होत आहे. वादाचे प्रसंग धंद्यात व नोकरीत निर्माण होतील. शेतकरी वर्गाला मनाप्रमाणे  काम करण्यात अडचणी येतील. परंतु नंतर पुढे संधी मिळेल. राजकीय- सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येईल. टिका होईल. संताप वाढू शकतो. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते. घरात वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. महत्त्वाची वस्तू सांभाळा.


वृश्चिक

सूर्य, बुध युती व कर्केत शुक्र तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. लोकांचे सहकार्य मिळणे थोडे कठीण आहे. राजकीय- सामाजिक कार्यात प्रति÷ा टिकून राहील. नवीन कार्याचा आरंभ होऊ शकेल. अति विश्वास कुणावरही टाकू नका. संसारात नाराजी होऊ शकते. धंद्यात खर्च वाढेल. पण मोठे काम मिळवता येईल. पेरणी करण्यास विलंब होऊ शकतो. क्रीडा क्षेत्रात चमकाल. जवळच्या मित्राला दुखवू नका.


धनु

बुध, प्लुटो षडाष्टक योग व कर्केत शुक्र प्रवेश करीत आहे. महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. जिद्द ठेवा. अडचणीवर मात करता येईल. धंद्यात कामगार वर्गाची कमतरता राहील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे श्रेय दुसरीच व्यक्ती घेऊन जाण्याची शक्मयता आहे. डोळय़ांची काळजी घ्या. पैसा जपून ठेवा. नोकरीत काम वाढेल. वृद्ध व्यक्तींची चिंता वाटेल. कला क्षेत्रात काम मिळेल.


मकर

तुमचा दबदबा वाढेल. महत्त्वाकांक्षा वाढवणारी घटना घडेल. थोरा मोठय़ांचा सहवास मिळेल. विचारांना चालना मिळेल. महत्त्वाची कामे, भेट व चर्चा या सप्ताहात करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यांत लोकांच्या कामाकडे लक्ष द्या. त्यांच्या उपयोगी  पडल्यास त्याचा फायदा तुम्हाला होईल. धंद्यात वाढ होईल. अनाठायी खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. घरात किरकोळ मतभेद होतील. वाटाघाटीचा प्रश्न निघू शकतो. परीक्षेत यश येईल.


कुंभ

राजकीय- सामाजिक कार्यात तुमची जबाबदारी वाढेल. वरि÷ांची नाराजी होऊ शकते. रविवार, सोमवार वाहन जपून चालवा. कायद्याचे पालन करा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. धंद्यात सामान्यस्थिती राहील. शेतकरीवर्ग संभ्रमात पडू शकतो. कला, क्रीडा क्षेत्रात मनाची अस्थिरता होईल. चंद्र, मंगळ युती व कर्केत शुक्र प्रवेश यामुळे आप्तेष्ट व मित्र यांच्यात तणाव होऊ शकतो. तुमचे मत त्यांच्यावर लादू नका.


मीन

धंद्यात चांगली कामे होतील. दोन हात कमी पडतील. कामांची गर्दी झाल्याने स्वभावात चिडचिडेपणा मंगळवार, बुधवार येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रति÷ा मिळेल. सूर्य, बुध युती व कर्केत शुक्र प्रवेश करीत आहे. दुसऱयाला मदत करा. परंतु स्वत:ची प्रतिमा खराब होऊ देऊ नका. घरातील लोकांना खूष ठेवता येईल. नवीन ओळख होईल. कला, क्रीडा, साहित्यात नावलौकीक मिळेल.