|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » करकंब पोलीस स्टेशनचा हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात

करकंब पोलीस स्टेशनचा हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात 

वार्ताहर/ करकंब

दाखल केलेल्या गुन्हय़ात अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी 25 हजार रुची लाच घेताना शुकवार दि. 1 जून रोजी रात्री 10 वा. करकंब पंढरपुर रोड लांडा महादेव चौकातील बस स्टॉपवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने करकंब पोलिस स्टेशनचे हवालदार शिवाजी व्हनखंडे याला रंगेहात पकडले.

यातील तक्रारदाराचे मेहुणे, रामहारी व इतर यांच्याविरूध्द करकंब पोलीस स्टेशनमध्ये सावकारी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल असून आलोसे यांच्याकडे तपासावर आहे. दाखल गुन्हयात अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदाराकडे प्रथम मध्यस्थीने 3,25,000 रुपये लाचेची मागणी करून व स्वत: तडजोड करून 60,000 रुपये लाचेची मागणी करून ठरले.

एकूण लाच रक्कमे पैकी 25,000 रुपये लाच स्वत: स्विकारली असता रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई सोलापूर एसीबीच्या पी आय कविता मुसळे, डी वाय एस पी अरूण देवकर,पी आय वैभव मारकड व टीमने केली आहे.

 

Related posts: