|Thursday, September 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » अमृता खानविलकर दिसणार हिंदी वेबसीरिजमध्ये

अमृता खानविलकर दिसणार हिंदी वेबसीरिजमध्ये 

धर्मा प्रॉडक्शन्सच्या ‘राजी’ सिनेमात पाकिस्तानी गफहिणी मुनिराच्या भूमिकेत दिसलेल्या अमफता खानविलकरने या भूमिकेतून बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवलाय. अमफताच्या या भूमिकेला फक्त चाहत्यांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही दाद मिळाली. राजीच्या मुनिरा भूमिकेमूळे अमफताला बॉलीवूडची कवाडं खुली झाली.

 राजीच्या शालीन आणि घरंदाज गफहिणीनंतर आता अमफता आपल्या चाहत्यांना एका वेगळय़ाच भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांनुसार, अमफताने आपल्या आजवरच्या करीयरमध्ये कधीही अशी भूमिका केलेली नाही. एवढी ही भूमिका तिच्यासाठी वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे. अमफताचा लवकरच डिजीटल दुनियेत डेब्यू होतो आहे. नव्या वेबसीरिजमध्ये असलेली तिची ही भूमिका रहस्यमय स्वरूपाची आहे. अमफता सध्या आपल्या करीयरच्या शिखरावर आहे. या शिखरावर गेल्यावर अर्थातच कलाकारांना अष्टपैलू भूमिका करण्याची इच्छा असते. अमफता नुकतीच एका घरंदाज गफहिणीच्या भूमिकेत राजीमध्ये दिसली होती. त्यानंतर ती आता एका बोल्ड आणि हिंसक भूमिकेत दिसेल. लवकरच सुरू होणाऱया या वेबसीरिजमध्ये अमफता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अमफताच्या या भूमिकेच्या आसपासच कथानक विणलं गेलं आहे. यविषयी अमफता सांगते, मला करियरच्या या वळणावर विविध प्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा आहे. रूढीबद्ध भूमिका न करता काहीतरी वेगळं करण्याची आणि त्यासाठी कोणत्याही कसोटीवरही माझी उतरण्याची तयारी आहे.

  माझी ही नवी भूमिकाही माझी कसोटी पणाला लावणारी आहे. ब्लॉकबस्टर राजी चित्रपटातल्या मुनिरा भूमिकेमुळे अमफताचं सर्वच स्तरांतून कौतुक झालं. याविषयी ती सांगते, मला अजूनही भरभरून प्रतिक्रिया मिळतायत. या भूमिकेसाठी मी घेतलेली मेहनत कामी आल्याचा आनंद वाटतोय. माझे चाहते, फिल्म इंडस्ट्रीतली मित्र-मंडळी यांच्याकडून पाठ थोपटली जातेय. त्यामुळे आता अजून जबाबदारीने काम करायची जाणीवही मला होतेय. अमफताच्या नव्या वेबसीरिजविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यातच असली तरीही अनेक खून केल्याचा आरोप असलेल्या अपराध्याच्या भूमिकेत अमफता यात दिसणार असल्याचं समजतंय. आपल्या भूमिकेविषयी अमफता म्हणते, या भूमिकेत मी तुम्हाला ग्रेशेड्समध्ये दिसेन. ही एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. जिचं आयुष्य आणि त्यातले निर्णय खूप बोल्ड आहेत. मला आनंद आहे की, राजीनंतर आता मला अशा भूमिका ऑफर होऊ लागल्यात. आज सिनेक्षेत्रात अशा कथांची आणि अशा भूमिकांची खूप गरज असल्याचं मला वाटतं, असे अमृता म्हणते.

Related posts: