|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आरे-वारे समुद्रात 5 पर्यटकांचा बुडून मृत्यू

आरे-वारे समुद्रात 5 पर्यटकांचा बुडून मृत्यू 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

तालुक्यातील आरे-वारे समुद्रात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील सहाजण बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडल़ी यातील पाचजणांचा मृत्यू झाला असून एका महिलेला वाचवण्यात यश आले आह़े मृतांमध्ये तीन महिला व दोन पुरूषांचा समावेश आह़े सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

केनेथ टिमोशी मास्टर्स (56), मोनिका बेंटो डिसोझा (55), सनोमी बेंटो डिसोझा (22), रेंचर बेंटो डिसोझा (19) मॅथ्यू बेंटो डिसोझा (18, ऱा सर्व होली क्रॉसरोड, शुभजीवन सर्कल, आयसी कॉलनी बोरीवली-पश्चिम मुंबई) अशी मृतांची नावे आहेत़ तर लिना मास्टर (45) असे दुर्घटनेत बचावलेल्या महिलेचे नाव आहे. यातील मृत हे फिरण्यासाठी रत्नागिरी येथे आले होत़े रविवारी सकाळी त्यांनी गणपतीपुळे येथे काही काळ थांबल्यानंतर सायंकाळी ते आरे-वारे येथे समुद्राच्या पाण्यात उतरले होते.

डिसोझा कुटुंब हे आरे-वारे येथे समुद्राच्या पाण्यात गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाह़ी यावेळी उसळणाऱया लाटांबरोबर ते अचानक खोल पाण्यात खेचले गेल़े  डिसोझा कुटुंब हे पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी  असलेल्या लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरडा केल़ा यावेळी तेथे असलेल्या काही तरूणांनी पाण्यात उडी घेवून एका मुलीला पाण्याबाहेर काढले, मात्र अन्य पाचजण पाण्यात बुडाल़े रविवार असल्याने आरे-वारे बीचवर नेहमीपेक्षा अधिक गर्दी असते. असे असताना देखील या समुद्रकिनाऱयावर सुरक्षेचे कोणतेही उपाय ठेवण्यात येत नाहीत़ काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी दोघांचा बुडून मृत्यू झाला होत़ा

याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल़ी यावेळी बुडालेल्या मृतदेहांना शोधण्यासाठी सुरक्षारक्षकांची मदत घेण्यात आल़ी अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर पाचही मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी आरे समुद्रकिनाऱयावर मोठी गर्दी केली होत़ी मृतदेह बाहेर काढण्यासाठी यावेळी प्रशासनाने स्थानिकांची मदत घेतल़ी 

रूग्णवाहिका पोहोचण्यास शिरगाव ट्रफिकचा अडथळा

आरे-वारे येथे पाचजण बुडाल्याची माहिती समोर आल्यानंतर रत्नागिरी येथून त्या ठिकाणी तातडीने रूग्णवाहिका पाठवण्यात आल्या होत्य़ा मात्र रविवार असल्याने रत्नागिरी आरे-वारे या मार्गावर नेहमीपेक्षा अधिक वाहनांची वर्दळ होती. त्यातच शिरगाव येथे ट्रफिकमध्ये रूग्णवाहिका अडकल्याने घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाल़ा त्यामुळे जिंदल कंपनीची व मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकांना घटनास्थळी जाण्याचे आदेश प्रशासनाने दिल़े

सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत

सुट्टीच्या हंगामात रत्नागिरी जिह्यात मोठय़ा प्रमाणावर पर्यटक दाखल झाले आहेत़ मात्र बाहेरून येणाऱया पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आह़े प्रशासनाच्यावतीने समुद्र किनाऱयावर सावधानतेचे फलक लावण्यात आले आहेत़ मात्र उत्साहाच्या भरात या ठिकाणी पर्यटकांकडून दुर्लक्ष होत असत़े येथे प्रशिक्षित सुरक्षारक्षक तैनात ठेवण्याची मागणी होत असतानाही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने स्थानिकांसह पर्यटकांमधून नाराजीचे सूर निघत आहेत.