|Monday, March 25, 2019
You are here: Home » Top News » विनोद तावडेंची राज ठाकरेसोबत ‘कृष्णकुंज’वर भेट

विनोद तावडेंची राज ठाकरेसोबत ‘कृष्णकुंज’वर भेट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात आज सकाळी कृष्णकुंजयेथे भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. ही भेट निवडणुकीच्या पाश्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.

ठाण्यामध्ये नाटय़संमेलन होणार आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी स्वतः विनोद तावडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु निमित्त जरी आमंत्रणाचे असले तर भेटीत विविध मुद्यांवर चर्चा झाल्याचे कळते आहे. गिरीश महाजन यांनी कालच छगन भुजबळ यांची भेट घेतली होती, तर आज तावडे आणि राज यांची भेट झाली. मुंबई आणि कोकणातील शिक्षकपदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरूवात केल्याचे म्हटले जात आहे.

Related posts: