|Saturday, October 20, 2018
You are here: Home » विविधा » नीट परिक्षेचा निकाल जाहीर , नांदेडचा कृष्णा देशात सातवा

नीट परिक्षेचा निकाल जाहीर , नांदेडचा कृष्णा देशात सातवा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेचा निकाल सीबीएसईकडून जाहीर करण्यात आला आहे. कल्पना कुमारी ही ऑल इंडिया रँकमध्ये पहिली आली असून, तिला 720 पैकी 691 गुण मिळाले आहेत.

महाराष्ट्रातील नांदेड जिह्यातील कृष्णा अग्रवाल हा तरुण देशात 7 वा आला असून, कृष्णाला 720 पैकी 685 गुण मिळाले आहेत. तसेच, कृष्णा बायोलॉजी विषयात देशात पहिला आला आहे. कृष्णाचे वडील आशिष अग्रवाल हे बालरोगतज्ञ आहेत, तर आई डेंटिस्ट आहेत.यंदाचा नीट परीक्षेचा कट ऑफ घसरला असून, जनरल कॅटेगरीसाठी यावषी 50 टक्के म्हणजे 720 पैकी 119 मार्क्स आहेत. मागच्या वषी हा कट ऑफ 131 होता. तर ओबीसी, एससी, एसटीसाठी हा कट ऑफ 40 टक्के म्हणजे 720 पैकी 96 मार्क्स असणार आहे, जो मागच्या वषी 107 होता. यंदा 7 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी कौन्सिलिंग राऊंडसाठी पात्र ठरले आहेत.

 

 

 

 

Related posts: