|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

चांगले कर्म करणाऱयालाच शत्रू फार

‘शत्रू निर्माण करण्याची गरज नाही, तुम्ही चांगले काम करा, स्वत:च्या कष्टाने प्रगती करा, सर्वत्र नाव कमवा, शत्रू आपोआप निर्माण होतील’, अशी म्हण आहे काहीजण जगाच्या कल्याणासाठी झटत असतात पण त्याला कुणी चांगले म्हणत नाहीत. पण त्याने क्षुल्लकशी चूक केली की त्याचे मोठे भांडवल केले जाते. खूनी दरोडेखोर तसेच अरेरावी करणारे, श्रीमंतीचा टेंभा मिरवणारे तसेच मुरलेले राजकारणी यांच्या वाटेला सहसा कुणी जात नाहीत, अथवा जाण्याची हिंमत नसते. पण तेच एखादा साधा माणूस चांगले काम करतो, काबाडकष्ट, योग्य नियोजन करून, काटकसर करून व कोणतीही व्यसने न करता प्रगती करून घेतो, घर, वाहन, बंगला वगैरे घेतो, त्याच्यावर मात्र लोकांचे बारीक लक्ष असते. एखाद्याने चांगले काम केल्यास त्याचे कौतुक करणारे फार कमी पण टिका करणारेच जास्त असतात. दुसऱयाला चांगले म्हणण्याचा प्रयत्न करा, तुमची आपोआप प्रगती होत जाईल. टीका टिपणी, हेवेदावे, मत्सर, पाठीमागून निंदा करणे, गैरसमज करून घेणे अथवा गैरसमज करून देणे, एखाद्याविषयी मागे नको ते बोलणे अशामुळे आपली पुण्याई कमी होत जाते व महत्त्वाची कामे ऐनवेळी अडतात. आपली कोणतीच कामे होत नाहीत. पैसा टिकत नाही, घरात कटकटी, शत्रुपीडा, आरोग्य बिघडणे, नोकरी टिकत नाही, अशा तक्रारी घेऊन लोक येत असतात यामागे बरीच कारणे असली तरी वाईट विचार हेच मुख्य कारण असते. संकटे ही प्रत्येकाला असतात. भरल्यापोटी उपदेश करायला काय जाते, असा नैराश्यवादी विचारही काहीजण करतात. विचार बदला नशीब बदलेल असे म्हणतात. चांगले विचार ठेवा. एखाद्याने चांगले काम केल्यास त्याला प्रोत्साहन द्या. इतरांचे कौतुक करण्यास शिका. सतत चांगल्या विचारांची पेरणी करीत गेल्यास त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील. भाग्योदयास सुरुवात होईल. मनातील इच्छा पूर्ण होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. घरचे वातावरणही सुधारू लागेल. नोकरी व्यवसायातील त्रासही संपतील. एका दिवसात हे घडणार नाही. मनावरील अनिष्ट विचारांचे मळभ दूर होऊ लागेल. तसतसे आपोआप ग्रहतारे नक्षत्रे शांत होऊन कुंडलीतील ग्रहमान स्वच्छ होईल. प्रयत्न करून पहा.

 

मेष

या आठवडय़ात बुध वगळता इतर ग्रह बलवान व शुभफल देणारे नाहीत. त्यामुळे  कोणतेही काम सावधपणाने करावे. सरकारी कामातील अडथळे वाढतील. पण अडथळे आले तरी काम मात्र होईल. णानसन्मान, प्रति÷ा यांच्या मागे न लागता नेहमीची कार्ये करीत रहा. विशेषत: महत्त्वाच्या गुप्त गोष्टींची वाच्यता करू नका, अन्यथा कुणीतरी त्याचा गैरफायदा घेण्याची शक्मयता आहे. संततीविषयी इच्छा मात्र पूर्ण होतील.


वृषभ

ग्रहमान म्हणावे तसे अनुकूल नाही. नुकसान होणार नाही पण म्हणावे तसे यशही लवकर मिळणार नाही. चैन व किरकोळ कारणांसाठी बराच खर्च होईल. अनेक मार्गाने धनलाभाची शक्मयता. पण टिकण्याची शक्मयता कमी. प्रवासात अविस्मरणीय घटना. विवाह व नोकरी व्यवसायात चांगले यश. अति सवलत दिल्याने घरमालक व भाडेकरू संबंध बिघडतील.


मिथुन

धनस्थानी शुक्राबरोबर राहू हा योग जितका लाभ त्याच्या दुप्पट खर्च दाखवितो. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. जेथे सायकलने काम भागते तेथे कार अथवा मोटारसायकलचा वापर करू नका. भाग्योदय, भरभराटीच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. अनेक इच्छा पूर्ण होतील. नोकरीत स्थलांतर अथवा प्रवास योग मानसिक समाधान देणाऱया घटना.


कर्क

राहू, शुक्र, चंद्र हा योग काही अंशी शापित मानला जातो. त्यामुळे आंतरजातीय प्रेमप्रकरणे उद्भवू शकतील. बुद्धिमंत अथवा देखणे असाल तर गुंड प्रवृत्तीचे लोक प्रेमात ओढण्याचा प्रयत्न करतील. तरुणींनी विशेष खबरदारी घ्यावी. कुणाचाही पायगुण या आठवडय़ात भाग्योदयाच्या दृष्टीने चांगला ठरेल. आयुष्यात कधीही पाहिला नसाल असे मोठे यश किंवा ऐश्वर्य लाभेल पण तुमच्या मूळ कुंडलीत तसे योग असावे लागतात. नोकरी व्यवसायात अतिशय लाभदायक वातावरण.


सिंह

राशीस्वामी रवी दशमात बलशाली आहे. त्यामुळे अत्यंत अवघड कामातदेखील सहज यश मिळवाल. शुक्र, राहू अनिष्ट स्थानी त्यामुळे अपघात, आजार, गैरसमज, शस्त्रक्रिया, शत्रुत्व, प्रेमप्रकरणे व त्यात फसवणूक असे प्रकार अनुभवाला येतील. धबधबे, समुद्रस्नान अथवा खोल दऱयाखोऱया, टोकदार कडेकपाऱया यांच्याशी दंगामस्ती अथवा सेल्फी अंगलट येण्याची शक्मयता.


कन्या

राश्याधिपती बुध प्रबळ आहे. कोणतेही मोठे काम यशस्वी करून दाखवाल. प्रेमप्रकरणे व अतिसलगी यापासून चार हात दूर रहा. शुक्र, राहूचा योग नको त्या प्रकरणात गुंतविण्याचा प्रयत्न करील. कोणतेही धाडस अंगलट येवू शकते काही प्रसंग घडून विवाहाचे योग. आर्थिक दृष्टय़ा अतिमहत्त्वाचे योग. कागदोपत्री व्यवहारात फसगत तसेच काही अघोरी प्रयोगांचीही शक्मयता राहील.


तूळ

राश्याधिपती शुक्र, राहुच्या सान्निध्यात आहे. त्यामुळे जगावेगळे काही तरी करून दाखविण्याची उर्मी  निर्माण होईल. इतर मार्गाने त्यामुळे मोठय़ा प्रमाणात धनलाभाची शक्मयता. तुमच्या वास्तुत काही दोष असतील. वास्तुशास्त्राच्या मागे न लागता केवळ मंत्रपठण सुरू करून पहा. संपूर्ण वातावरण बदलून जाईल. व कुटुंबात सुख समृद्धी लाभेल. शत्रुपीडा व अपघातापासून जपावे लागेल.


वृश्चिक

शुक्र, राहू योग भाग्यात होत आहे. नको त्या अध्यात्मिक व्यक्तीच्या मागे लागल्याने सर्वस्व गमावून बसाल. त्यासाठी व्यवहारी वृत्ती व प्रसंगावधान ठेवून वागा. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगले योग. प्रमोशन इच्छीत स्थळी बदली. स्वत:ची वास्तू होऊ शकेल. आर्थिक बाबतीत मध्यम योग पण खर्च मात्र वाढतील. वाहन जपून चालवा.


धनु

सर्व तऱहेने भाग्योदयकारक ग्रहमान आहे. कोणतेही व्यसन नसेल उच्च शिक्षित व सुसंस्कृत असाल, घरात पावित्र्य असेल, तसेच संकल्प पवित्र असेल तर मनातील अवघड इच्छाही पूर्ण होऊ शकतील. धनलाभ, प्रवास, शिक्षण, नोकरी व संततीच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील.विहीर, बोअर व वास्तू संदर्भात अनुकूल योग.


मकर

वास्तुतील नको असलेली अडगळ काढा. इतरांनी दिलेल्या जुन्या व बंद झालेल्या वस्तू चुकूनही घरात ठेवू नका. अन्यथा महत्त्वाची कामे खोळंबतील योग्य माणसाला जर नको ते काम दिल्यास त्याची काय अवस्था होईल, असा प्रश्न निर्माण करणारे ग्रहमान आहे. अशावेळी मन शांत ठेवून मगच निर्णय घ्यावे लागतात. काही निर्णय चुकीचे वाटतील. पण तरी त्याचा फायदा होईल, असे दिसत नाही.


कुंभ

मृत्यूषडाष्टकात शुक्र राहू म्हणजे प्रेमप्रकरणात फसवणूक, पैशासाठी तगादा व ब्लॅकमेल करण्याची धमकी असे प्रकार घडत असतात. तरुणींनी वाटसऍपवर आपले फोटो घेतले असतील तर ते त्वरित हटवावेत, अन्यथा नको त्या प्रकरणात फसाल. स्वत:चे कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळेल. धनलाभाचे  मोठय़ा प्रमाणात लाभ होण्याचे योग. धनलाभाव्यतिरिक्त वास्तू, जागा, वाहन यांचा लाभ होण्याचे योग.

मीन

पंचमात शुक्र, राहू हा योग भल्या भल्या साधू संतांचे नैतिक आचरण बिघडविणारा योग. आपण तरी साधी माणसे. कसे वागावे याचा निर्णय घेऊन त्यानुसार धोरण आखा. म्हणे फसवणूक होणार नाही. व्यावसायिक क्षेत्रात तुमचा स्वतंत्र ठसा उमटेल. अवघड वाटणारी आर्थिक कामे चुटकीसरशी सुटतील. मोठमोठय़ा कामात यश मिळवाल. घरात कुणाचे तरी मंगलकार्य ठरेल.