|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अभाविपतर्फे मोफत बसपास वितरण करण्याची मागणी

अभाविपतर्फे मोफत बसपास वितरण करण्याची मागणी 

प्रतिनिधी/ बेळगाव

या वषी महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्क वाढ झाल्याने ते भरणे विद्यार्थ्यांना कठीण होत आहेत. अनुसुचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांबरोबर सर्व विद्यार्थ्यांना मोफत बसपास द्यावा, या मागणीसाठी मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन करण्यात आले.

सध्या महाविद्यालयीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. परंतु अद्याप बसपासचे वितरण करण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी बसपास असणे गरजेचे आहे. मोफत बसपासची सोय फक्त अनुसुचित जाती-जमातींतील विद्यार्थ्यांना मिळत आहे. या विद्यार्थ्यांबरोबर सर्वच विद्यार्थ्यांना बसपासची सोय असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातही याच पासवर फिरण्याची मुभा असावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱयांच्यावतीने शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांनी निवेदन स्विकारले. यापूर्वी चन्नम्मा चौकात साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगाव शहर प्रमुख रोहीत उमदाबादीमठ, भिमसेन पप्पु, श्रीशैल हिरेमठ यांच्यासह विविध महाविद्यालयीन विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.