|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » आई काम सांगते,भाऊ घराबाहेर जाण्यास मनाई करतो,म्हणून 13 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

आई काम सांगते,भाऊ घराबाहेर जाण्यास मनाई करतो,म्हणून 13 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या 

ऑनलाईन टीम / भिवंडी :

घरात असल्यावर आई टीव्ही पाहू देत नाही सारखे काम सांगत असते आणि भाऊ घराबाहेर जाण्यास मनाई करतो, याचा राग डोक्यात ठेवऊन एका 13 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भिवंडीतील कोंबडपाडा येथे घडली आहे.

कुटुंबीय घरात नसतांना ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतला आहे. मुलीचे वडील रोजंदारीवर काम करतात तर आई परिसरात धुणीभांडी करून घर चालवत असतात. तिचे दोन्ही भाऊ गोदामात कामाला जातात. ती नुकतीच आठवी पास होऊन नववीत गेली होती. घरकामात मदत करावी, असे तिचे आईवडील तिला सांगत असत. ‘आई टीव्ही बघू न देता सतत काम सांगते तर भाऊ घराबाहेर जाण्यास मनाई करतो, यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख तिने सुसाईड नोटमध्ये केला आहे,’ अशी माहिती निजामपुरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ  पोलिस निरीक्षक यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तर तिच्या कुटुंबीयांनी मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.