|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » तारिक विप्रोच्या संचालक मंडळात

तारिक विप्रोच्या संचालक मंडळात 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विप्रोचे अध्यक्ष अजीम पेमजी यांचा कनिष्ठ पुत्र तारिक प्रेमजी याला विप्रो एन्टरप्रायजेसच्या संचालक मंडळात नियुक्त करण्यात आले. तारिक याला सूचीबाहय़ असणाऱया विप्रो एन्टरप्रायजेसमध्ये बिगर कार्यकारी संचालकाचे पद देण्यात आले. अजीम प्रेमजी आणि वरिष्ठ पुत्र रिशद प्रेमजी यांचा पहिल्यापासूनच संचालक मंडळात समावेश आहे.

तारिक यांच्या स्वतंत्र विचारांमुळे संचालक मंडळातील चर्चांमध्ये नवीन मूल्यांचा समावेश होईल असे कंपनीकडून सांगण्यात आले. विप्रो एन्टरप्रायजेसचे विप्रो कंज्युमर केअर आणि विप्रो इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग या दोन प्रमुख व्यवसायांचा समावेश आहे. कंपनीच्या संचालक मंडळात सुरेश सेनापती, विनीत अग्रवाल, प्रतिक कुमार यांचा समावेश आहे.

Related posts: