|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह दोघे निलंबित

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह दोघे निलंबित 

प्रतिनिधी/ बेळगाव

माळमारुती पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह दोघा जणांवर शुक्रवारी सायंकाळी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी ही कारवाई केली आहे.

माळमारुतीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुलखादर झेंडे व पोलीस सी. एस. महिशवाडगी यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी सकाळी पोलीस निरीक्षक चन्नकेशव यांनी या दोघा जणांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केली होती. त्यानंतर या संबंधी पोलीस आयुक्तांकडे अहवाल पाठविण्यात आला होता.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुलखादर झेंडे व पोलीस सी. एस. महिशवाडगी हे गुरुवारी रात्री रक्षक वाहनातून गस्तीवर होते. शुक्रवारी सकाळी 6 वाजता महांतेशनगरजवळ आपले वाहन उभे करुन हे दोघे या मार्गावर येणारी वाहने अडवून तपासणी करीत होते. मात्र हे दोघे नशेत असल्याच्या संशयावरुन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.