|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » भविष्य

भविष्य 

 मेष

मिथुनेत बुध, रवि प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. व्यवसायात वाढ होईल. पैसा मिळेल. सरकार दरबारची कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे नेतृत्व सर्वांना मान्य होईल. तुमचे मुद्दे पटवून देता येतील. शुक्रवार, शनिवार संसारात मतभेद नाराजी होईल. खर्च वाढेल. अचानक पाहुणे येतील. क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परीक्षेत यश मिळेल.


वृषभ

समस्या सोडवण्यास कुणाचेही सहकार्य मिळू शकेल. संघर्ष संपलेला नाही. तरीही उत्साह वाढेल. कामे  होण्याची आशा निर्माण होईल. मिथुनेत बुध व रवी प्रवेश करीत आहे. घरातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. घटस्फोट टाळता येईल. व्यवसायात सुधारणा होईल. थोडक्मयात समाधान ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कार्याला गति येईल. वरि÷ पाठिंबा देतील. कायद्याच्या कामात यश येईल.


मिथुन

स्वराशीत बुध, सूर्य प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या मध्यावर तणाव होईल. कायद्याच्या कामात अहंकार ठेवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात आरोप येतील. टिका होईल. तुमचे विचार पटणे कठीण. नोकरीत वाकडय़ा वाटेने जाऊ नका. वरि÷ांची नाराजी येऊ शकते. व्यवसायात फायद्यासाठी कोणतीही उलाढाल नको. तात्पुरती समस्या आहे. पुढे संधी मिळेल. प्रति÷ा सांभाळा.


कर्क

सप्ताहाच्या सुरुवातीलाच महत्त्वाची कामे करा. भेट घेऊन चर्चा करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य तो निर्णय घ्या. वरि÷ांच्या सल्ल्यानुसार बोला व वागा. मिथुनेत बुध, सूर्य प्रवेश करीत आहे. नोकरीत काम वाढेल. बेकायदेशीर कोणतेही कृत्य करू नका. कायद्यानुसार बोला. कोर्टकेसमध्ये यश खेचता येऊ शकेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. संसारात, धंद्यात लक्ष द्या.


सिंह

मिथुन राशीत बुध, सूर्याचे राश्यांतर तुमच्या प्रगतीला सहाय्य करणारे आहे. तुमच्या क्षेत्रातील कोणतेही कठीण काम करण्याचा प्रयत्न करा. यश मिळेल. गुप्त कारवायांचा नीट अभ्यास करा. म्हणजे त्यानुसार डावपेच राजकीय,  सामाजिक क्षेत्रात टाकता येतील. संसारात मतभेद होईल. संततीची, जीवनसाथीची,  नाराजी होऊ शकते. पदाधिकारी मिळेल. धंद्यात वाढ होईल. थकबाकी वसूल करा. कला क्रीडा क्षेत्रात चमकाल. लाभ मिळेल.


कन्या

सप्ताहाच्या सुरुवातीला दगदग होईल. थकवा वाटेल. पोटाची काळजी घ्या. पित्त उष्णतेचा त्रास संभवतो. मिथुनेत बुध, रवी प्रवेश करीत आहे. मंगळवारपासून तुमच्या कार्यास यश मिळेल. प्रयत्न करा. धंद्यात सुधारणा व वाढ होईल. थकबाकी वसूल होईल. राजकीय- सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे बौद्धिक असतील. वरि÷ांना आवडतील. संसारात सुखद समाचार मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती व लाभ होईल.


तुळ

मिथुनेत बुध, रवी प्रवेश करीत आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करीत असाल तेथे मंगळवार, बुधवार सावध रहा. वाद होईल. प्रवासात सावध रहा. कोणत्याही प्रकारचे धाडस त्रासदायक ठरू शकते. राजकीय, सामाजिक कार्याला योग्य दिशा देण्यासाठी आखणी करा. घरातील वातावरण चांगले राहील. तुम्हाला पाठबळ मिळेल. धंद्यात आहे तेच काम नीट करा. कायदा मोडू नका. व्यसन, मारामारी हे टाळा.


वृश्चिक

सर्वच ठिकाणी संमिश्र स्वरुपाच्या घटना घडतील. तुमचा उत्साह व आक्रमकता यावर नियंत्रण ठेवा. कोणतेही मत व्यक्त करताना मागचा पुढचा विचार करा. राजकीय, सामाजिक कार्यात सावध रहा. विरोधक तुमचे डावपेच उधळून लावण्याचा प्रयत्न करतील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. दबाव राहील. संसारात वृद्ध क्यक्तीची काळजी वाटेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीसाठी मेहनत घ्या.


धनु

धनुराशीच्या सप्तमस्थानात बुध, सूर्याचे राश्यांतर होत आहे. सर्वच ठिकाणी बिघडलेली घडी नीट करण्याची संधी तुम्हाला मिळेल. सप्ताहाच्या मध्यावर प्रकृतीची काळजी घ्या. खर्च वाढेल. जवळच्या व्यक्तीसंबंधी चिंता वाटेल. शेजाऱयावर जास्त विश्वास ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खंबीर रहा. पण उध्दटपणा दिसू देऊ नका. बोलताना सावध रहा. पुढे संधी मिळेल.


मकर

मकरेच्या ष÷स्थानात बुध, रवी प्रवेश करीत आहे.सप्ताहाच्या सुरुवातीलाच महत्त्वाची कामे करा. राजकीय सामाजिक क्षेत्रात कोणालाही कमी समजू नका. तुमच्यावर एखाद्या प्रकरणासाठी दबाव टाकला जाईल. तुमची प्रतिमा डागाळली जाईल, असे वक्तव्य व कृती  करू नका. तुमचे ध्येय समोर ठेवा. पण योग्य तीच तडजोड करा. खऱया जवळच्या माणसाचा सल्ला घ्या. प्रवासात वाहन जपून चालवा. रागीष्टपणा दूर ठेवा.


कुंभ

तुमच्या पंचमस्थानात बुध, रवी प्रवेश करीत आहे. घरात, संतती व जीवनसाथीबरोबर एखाद्या मुद्यावरून तणाव होईल. मतभेद वाढतील. अचानक खर्च निर्माण होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिस्थितीचे अवलोकन करा. तटस्थपणा ठेवा. प्रतिक्रिया व्यक्त करण्याची घाई नको. तुमचा राग वाढेल. जवळचे लोक मनस्ताप देतील. व्यवसायात मोठी संधी मिळेल. पण निर्णय पुढील आठवडय़ात होईल.  कोर्टाचे काम पुढे टाका.


मीन

सुखस्थानात बुध, रवी प्रवेश करीत आहेत. तुमच्या धंद्याशी व सामाजिक कार्याशी स्पर्धा करणारे लोक वाढतील. तुम्हाला नाउमेद करण्याचा प्रयत्न होईल. तुमचे मनोबल मात्र टिकवता येईल. धंद्यात वाढ होईल. पैसे जपून ठेवा. राजकीय क्षेत्रात पदाधिकार मिळेल. निर्णय चुकणार नाही, याची काळजी घ्या. घरातील लोकांची मदत उपयोगी पडेल. कलेत प्रगती होईल. नावलौकिक मिळेल.