|Sunday, August 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » सात जणांच्या जिद्दीतून साकारलेला ‘द ऑफेंडर’

सात जणांच्या जिद्दीतून साकारलेला ‘द ऑफेंडर’ 

  जगाला काहीतरी वेगळे करून दाखवण्याची तळमळ प्रत्येक तरुणाला असते. याच तळमळीतून, चित्रपट क्षेत्राची कसलीही पार्श्वभूमी नसताना अर्जुन महाजन, डॉ. अमित कांबळे, दिनेश, अनिकेत, सोमनाथ, सूरज आणि शिवाजी या सात मित्रांनी सावंतवाडी डेज… नावाचा एक लघुपट तयार केला आणि 13 व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला पाठवला. मात्र, महोत्सवात समीक्षकांकडून गौरविला गेलेला हा लघुपट काही तांत्रिक कारणामुळे थिएटरपर्यंत पोहोचू शकला नाही. इतके दिवस कसून केलेल्या मेहनतीवर पाणी पडणार? अशी परिस्थिती निर्माण झाली.

  मात्र, डोक्यातला विषय आणि आतापर्यंतचे कष्ट या मंडळींना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे आता आपण थेट चित्रपटच करू आणि ज्या थिएटरमध्ये सावंतवाडी डेज लागला नाही त्याच थिएटरमध्ये लावून दाखवू, असा निर्धार या सगळय़ांनी केला. हे म्हणावे तितकं सोपे नव्हते. पण तरी ही सगळी मंडळी नव्या जोमाने कामाला लागली आणि सलग 3 वर्षे अविरत मेहनत घेऊन ‘द ऑपेंडर-स्टोरी ऑफ अ क्रिमिनल’ हा मराठी सस्पेन्स थ्रिलर आकारास आला. सफजनतेचा ध्यास घेऊन अनेक अडथळयांची शर्यत ओलांडत पुढे जाणाऱया या 7 तरुणांच्या प्रयत्नांची कहाणी आता येत्या 15 जूनला मराठी रुपेरी पडद्यावर साकार होणार आहे.

   भीती, प्रेम, विश्वास यांचा संमिश्र अनुभव देणारा थरारपट म्हणजे द ऑपेंडर. या चित्रपटात अर्जुन महाजन, डॉ. अमित कांबळे, दिप्ती इनामदार, दिनेश पवार-पाटील, अनिकेत सोनवणे, सूरज दहिरे, शिवाजी कापसे, सोमनाथ जगताप आणि लव्हनिस्ट हे कलाकार असून त्यांनी लेखनापासून दिग्दर्शनापर्यंतच्या सर्व भूमिका पार पाडण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे. मराठी चित्रपटांमध्ये अभावाने आढळणाऱया क्लायमॅक्स-अँटीक्लायमॅक्स, पॅरॅलल एडीट वगैरे पद्धती त्यांनी बेधडकपणे व आत्मविश्वासाने हाताळल्यामुळे चार आंतरराष्ट्रीय फेस्टीव्हलमध्ये गौरवलेला द ऑपेंडर, या 7 तरुणांच्या विचारांचा आरसा ठरतो. चित्रपटक्षेत्रात पहिले पाऊल टाकताना त्यांनी केलेले काम निश्चितच वेगळे, उठावदार आणि आश्वासक आहे.

  या चित्रपटाचे निर्माते एस. एम. महाजन आणि व्ही. आर. कांबळे असून संकलन-दिग्दर्शन आणि गीते अर्जुन महाजन यांची तर सहाय्यक दिग्दर्शन सोमनाथ जगताप यांचे आहे. चित्रपटाची कथा डॉ. अमित कांबळे यांची असून पटकथा व संवाद अर्जुन महाजन व डॉ. अमित कांबळे यांनी लिहिले आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी अनिकेत सोनवणे, डॉ. अमित कांबळे यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन सूरज दहिरे यांचे, ध्वनीमुद्रण दिनेश पवार यांचे असून निर्मिती व्यवस्थापन शिवाजी कापसे यांनी केले आहे. संगीत आरोह, कृष्णा सुजीत यांनी दिले असून आरोह वेलणकर, स्वप्नील भानुशाली यांनी या चित्रपटातील दोन गाणी गायली आहेत.

 

Related posts: