|Thursday, July 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » चाळीशीतील नटखट कथा ‘नॉटी फॉर्टीज’

चाळीशीतील नटखट कथा ‘नॉटी फॉर्टीज’ 

  रंगभूमीवर नेहमीच विविधांगी विषयांवर आधारीत आशयघन नाटके येत असतात. त्यातील काही सत्यघटनांवर आधारीत असतात तर काही काल्पनिक. काही दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात तर काही नाटके काहीशी खटय़ाळ असतात. अलिकडेच रंगभूमीवर आलेले ‘नॉटी फॉर्टीज’ हे अशाच खटाळय़ांची  कथा सांगणारे आहे.

  वाह रंग! प्रॉडक्शन्स निर्मित आणि चंद्रवलय प्रकाशित ‘नॉटी फॉर्टीज’ या नाटकाची निर्मिती अविनाश वारंग यांनी केली आहे. संकल्पना वंदना राणे-जोगी यांची असून त्या या नाटकाच्या सहनिर्मात्याही आहेत. या नाटकात खुमासदार कथानक आणि ओठांवर अलगद हास्य फुलविणाऱया संवांदांची उधळण असल्याचे शीर्षकावरूनच जाणवते. वाशी येथील विष्णूदास भावे नाटयगफहात शुभारंभाचा प्रयोग झाल्यानंतर ‘नॉटी फॉर्टीज’ची टीम महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात नाटकाचे प्रयोग करण्यासाठी सज्ज झाली आहे. नाटय़रसिकांकडूनही या धमाल नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने निर्माता-दिग्दर्शकांच्या जोडीला कलाकार-तंत्रज्ञांचाही आत्मविश्वास दुणावला आहे. आशू आणि नीता या प्रेमविवाह झालेल्या एका जोडप्याची कथा या नाटकात पाहायला मिळते. लग्न होऊन 23 वर्षे लोटलेल्या आशु-नीताच्या संसारवेलीवर दोन फुले फुललेली आहेत. त्यांची दोन्ही मुले पाचगणीला शिकताहेत. आशू बीएमसीत इंजिनियर पदावर कार्यरत आहे. तर नीता एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतेय. या दोघांच्या संसारात जे घडतं ते ‘नॉटी फॉर्टीज’ या नाटकात पाहायला मिळते. एखाद्या अचानक येणाऱया वळणावर हे नाटक येऊन पोहोचते.

   मुकुंद महाले आणि अविनाश वारंग यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन सुनील परब यांनी केले आहे. या नाटकाची कथा कोणत्याही काळात घडणारी असल्याचे सांगत सुनील परब म्हणाले की, करिअर आणि संसार यांच्यातील ताळमेळ साधताना आपण कित्येकदा तडजोडी करत असतो. यातील काही तडजोडी शारीरिक असतात तर काही मानसिक. चाळीशीमध्ये गेल्यावर काहींच्या मनातील इच्छा उचंबसन येतात आणि त्यांचे मन भरकटू लागते. या परिस्थितीत कित्येकदा त्यांच्याकडून चुकीची पावलेही पडली जातात. बऱयाचदा काहीही न करता एखादे प्रकरण अंगलट येतं. त्यातून कशी वाट काढली जाते आणि त्यासाठी किती किंमत मोजावी लागते त्याची गोष्ट या नाटकात पाहायला मिळते.

   वंदना राणे-जोगी, अविनाश वारंग, स्नेहा जोशी, चंद्रशेखर पांचाळ, नितीन सुरेश, सुधीर श्रीधर आणि संजीव धुरी या कलाकारांनी या नाटकातील विविध व्यक्तिरेखांमध्ये रंग भरले आहेत. सचिन वारीक यांनी नेपथ्य केले असून प्रकाशयोजना मोहन आगवाने यांची आहे. संगीतकार रुपेश दुदम यांनी संगीत दिले आहे तर शैलेश रोकडे या नाटकाचे सूत्रधार आहेत.