|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंढरीत युवकांवर खुनी हल्ला

पंढरीत युवकांवर खुनी हल्ला 

पंढरपूर / प्रतिनिधी

मित्रांमधील वादाचे पर्यावसान मोठय़ा भांडणात होऊन पंढरीतील कराड रस्त्यावर असणाऱया रेल्वे ग्राऊंडनजीक पिनू ठाकरे या तरूणावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला झाल्याची घटना रविवारी घडली. घटनेनंतर जखमी ठाकरेंवर पंढरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या खुनी हल्ल्याने पंढरीत भीतीचे सावट आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी पाच वाजण्याच्या दरम्यान येथील कराड रोडवर असणाऱया पिनु ठाकरे या युवकावर काही अज्ञाताकडून खुनी हल्ला झाला. अत्यंत धारदार शस्त्राने सदरचा हल्ला झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले.  हल्ला झाल्यावर मारेकरी निघून गेले. मात्र त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या जखमींला तात्काळ उपचारासाठी येथील खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

गेल्या दोन दिवसापासून मित्रांमध्ये सुरू असलेल्या वादामधून पिनू ठाकरे याला त्यांच्याच मित्रांनी बोलावून घेतले आणि गाडीवर घेऊन निघाले. त्याचदरम्यान धारदार शस्त्र आणि लोखंडी गजाने त्याच्या पोटात, पाठीवर आणि डोक्यात वार करून त्याला जखमी केले. याबाबत रात्री उशीरापर्यत फ्ढिर्याद दाखल करून घेण्यासाठीची कार्यवाही सुरू होती.

यामध्ये पोलिसांनी जखमीकडून घेतलेल्या प्राथमिक माहितीमध्ये तीन ते चार मारेकरऱयांची नावे जखमी ठाकरेंकडून निष्पन्न झाले असल्याचे समजते आहे. त्यावरून सध्या पोलिसांनी तपासचक्रे फ्ढिरूवून आरापींच्या शोधकार्यासाठी काही पथके रवाना केली आहेत.

पिनु ठाकरेचे आणि त्यांच्या काही मित्रांचे गेल्या दोन दिवसापासून मोठे वाद सुरू होते. याच वादामधून पिनू ठाकरेंवर हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पिनु ठाकरेची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तींची असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगतामधील अंतर्गत वाद उफ्ढाळून येउनच घटना घडल्याचे बोलले जात आहे.

18 मार्च रोजी पंढरपुरात भरदिवसा नगरसेवक संदीप पवारचा खून करण्यात आला होता. त्यानंतर पंढरपूर दहशतीच्या सावटाखाली होते. आता पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे दिसते आहे.