|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » प्रजनीश गुणेश्वरन पात्र

प्रजनीश गुणेश्वरन पात्र 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा नवोदित टेनिसपटू प्रजनीश गुणेश्वरन पहिल्यांदाच एटीपी विश्व टूर स्पर्धेच्या एकेरीच्या प्रमुख ड्रॉ साठी पात्र ठरला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट येथे झालेल्या मर्सिडीस चषक पात्र फेरीच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रजनीशने ख्रिस्टेन हॅरिसनचा 6-3, 4-6, 6-3 असा पराभव करत पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविले. स्टुटगार्ट स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या पहिल्या सामन्यात प्रजनीशची गाठ कॅनडाच्या डेनिस शेपोव्हॅलोव्हशी पडणार आहे.