|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » उद्योग » यंदा विकास दर 7 टक्क्यांवर पोहोचण्याचा सीईओंना विश्वास

यंदा विकास दर 7 टक्क्यांवर पोहोचण्याचा सीईओंना विश्वास 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2018-19 या आर्थिक वर्षात विकास दर 7 टक्क्यांच्या पलिकडे पोहोचेल असे 80 टक्क्यांपेक्षा अधिक सीईओंनी म्हटल्याचे सीआयआय या औद्योगिक क्षेत्रातील संघटनेने म्हटले. 80 टक्क्यांपेक्षा अधिक सीईओंच्या मते देशातील क्षमतेचा वापर वाढेल असे त्यांनी वाटते. 72 टक्के सीईओंच्या मते 7 ते 7.5 टक्के दरम्यान विकास दर राहील, तर 7.5 टक्क्यांवर पोहोचेल असे 10 टक्के जणांनी मत व्यक्त केले.

पुढील काही वर्षांत जीडीपी दर 8 टक्क्यांवर पोहोचेल असे औद्योगिक क्षेत्राचे मत आहे. वित्तीय दूरदर्शीपणा, मायक्रोइकोनॉमिक व्यवस्थापन आणि कठोर सुधारणा करण्यात येत असल्याने विकास दर सुधारण्यास हातभार लागत आहे, असे सीआयआयचे अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांनी म्हटले.

41 टक्के सीईओंच्या मते यंदाही विदेशी गुंतवणुकीचा आकडा कायम राहील. तर, 92 टक्के सीईओंच्या मते, मागणीमध्ये वाढ होत असल्याने चालू वर्षात आर्थिक विकास वाढण्याचे प्रमुख कारण आहे. चालू वर्षात रोजगारनिर्मितीही समाधानकारक होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.