|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मराठी भाषा ही सक्षम व परीपूर्ण

मराठी भाषा ही सक्षम व परीपूर्ण 

प्रतिनिधी/ फातोर्डा

मराठी भाषा सक्षम व परीपूर्ण आहे. त्यांचे शद्ब कमी असूनही लहान शद्बाला मोठे अर्थ आहेत. कमी अक्षराची वाक्ये बनवता येतात आणि हे इंग्रजीमध्ये होत नाही. आजही भारतात इंग्रजी माध्यमातून घेण्यात येणाऱया विज्ञानाच्या पद्व्युत्तर शिक्षणामध्ये वापरले जाणारे परीभाषिक शद्बांपैकी 80 टक्के शद्ब मराठी भाषेत उपलब्ध आहेत. आणि हे शास्त्राrय परीभाषा कोष संकलन यश दाते आणि चि. च. कर्वे यांनी 1948 साली छापून प्रसिद्ध केलेले आहेत. मराठी माध्यमातून शिकल्याने संस्कृती व भाषा टिकते असा जो गैरसमज गेली 150 वर्षापासून सुरु आहे तो प्रभावी नाही. कारण इंग्रजी माध्यमातून शिकुनही मुलांना घरातून संस्कृती चालू ठेवू शकतात, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील शिक्षणतज्ञ अनिल गोरे यांनी दवर्ली रूमडामळ येथील श्री स्वामी समर्थ गडाच्या सभागृहात केले.

 ‘प्राथमिक शिक्षण मराठीतून असावे’ या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिक्षणतज्ञ उदय बाळ्ळीकर, मडगावचे बालभवन प्रमुख सुनिल नाईक, लक्ष्मीकांत मणेरकर, माजी शिक्षक अनिल कामत, पत्रकार अनुया शिरोडकर व जयेश नाईक उपस्थित होते. यावेळी सुनिल नाईक यांच्या हस्ते अनिल गोरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुरुवातीला मंदिराचे अध्यक्ष जयेश नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पुढे बोलताना गोरे म्हणाले, शिक्षण म्हणजे काही गोष्टी समजून घेणे आणि आपली जबाबदारी पार पाडताना त्याचा योग्य वापर   करणे. याच्या आकलन व अभिव्यक्तीसाठी सुयोग्य अशी भाषा शोधली पाहिजे आणि त्याला मराठी शिवाय पर्याय नाही. मराठी कमी कष्टात, कमी ताणात व कमी वेळेत समजणारी भाषा आहे. मराठी भाषेत शद्ब अर्थपूर्ण व कमी जोडाक्षरे असलेली रचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे शद्ब उच्चारताना, ऐकताना, व्यक्त करताना सोपे वाटतात. अनावश्यक भेसळ त्यात नाही. मराठी वाक्यात शद्बांची जागा बदलली तरी अर्थ तोच राहतो.

भारतात 99 टक्के नोकरीत इंग्रजीची आवश्यकता नसते. रोजगारासाठी इंग्रजीची गरज नसते. गोवा आणि महाराष्ट्रात रोजगारासाठी इंग्रजीचा वापर केल्याने इतर प्रांतातील लोकांना रोजगाराचा फायदा मिळू लागला. राज्यभाषेतून कारभार चालवला असता तर रोजगार राज्यातील लोकांपुरता मर्यादित राहिला असता. गुजराथ, बंगाल, पंजाब, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यात विज्ञान शाखेतील पद्व्युत्तर शिक्षण राज्यभाषेतून घेता येते. राज्यकारभार राज्यभाषेतून चालतात. त्यामुळे रोजगार फक्त त्यांनाच मिळतो. मराठी भाषा साधी, सोपी, एकमेकांशी संबंध जोडणारी, अर्थपूर्ण, शिकायला कमी वेळ लागणारी भाषा असून मराठीतून ऐकलेल्या गोष्टी मरेपर्यंत लक्षात रहातात.