|Sunday, July 21, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मंत्राचे उच्चारण शुद्ध हवे तरच फायदा होतो!

बुध. दि. 13 ते 19 जून 2018

अमूक मंत्राचे हजारो लाखो जप केले, स्तोत्रांची हजारो पारायणे केली, सांगितल्याप्रमाणे ग्रहांचे पदार्थ दान केले, पण गुण येत नाही, असे अनेकजण म्हणत असतात. पण कोणताही मंत्र अथवा स्तोत्र कसे म्हणावे, हेच अनेकांना माहीत नसते. मंत्र, स्तोत्राची पथ्ये काय आहेत. संकल्प काय आहे. त्या स्तोत्रात शेवटी काय सांगितलेले आहे. ज्या ऋषीमुनींनी मंत्र अथवा स्तोत्राची रचना केली. त्यांनी त्या स्तोत्रात काय सांंिगतलेले आहे हे कुणी पहात नाहीत. गणपती ही बुद्धीची देवता, अथर्वशीर्षासह त्याचे कोणतेही स्तोत्र व्यवस्थित न म्हटल्यास अपयशाची शक्मयता जास्त. तसेच मारुती स्तोत्र, श्री सुक्त पुरुषसुक्त, उदक शांती व अपामार्जन मंत्र, त्रिपिंडी, नारायण नागबली, आश्लेषा बली वगैरे शांतीच्यावेळी मंत्र म्हणत असताना बऱयाच चुका होत असतात. संकल्प सांगताना ‘मन कुटुंबस्य पीडा परिहार’ ऐवजी ‘पीडा प्राप्त्यर्थ’ असा संकल्प एका भटजींनी सांगितला होता. अधिक मासात छिदे असलेल्या 33 वस्तू अथवा पदार्थ का दान देतात याचे उत्तरही दान घेणाऱयाला देता आलेले नाही. कालसर्पयोग, त्रिपिंडी, नारायण नागबली हे विधी केल्यावर भयानक त्रास सुरू होतात. वर्षाभरात कुणीतरी दगावते. नोकऱया सुटतात, संसार बिघडतात व असलेले सर्व होते की नव्हते होऊन जाते, पण असे का होते याचे समाधानकारक उत्तर कुणी देत नाहीत. कोणताही मंत्र असो स्तोत्र अथवा शांती असो, त्याचे चांगले फळ मिळायला हवे. पण ते मिळत नाही. विधी करताना कांही चुकले आहे का ते पहा असे सांगितल्यावर अनेकांना राग येतो. पण चूक सुधारावी असे त्यांना वाटत नाही. यासाठीच मंत्र तंत्र, शांती वगैरे करताना तितका अधिकार आपल्याला आहे का आपण त्यात तज्ञ आहोत का उच्चार स्वच्छ आहेत का मंत्रांचा अर्थ माहीत आहे का ते पहावे. मंत्र स्तोत्र वाचण्यापूर्वी भटजींच्याकडून ते शिकून घ्यावेत. नंतर ते स्वच्छ उच्चारात म्हणावेत. चुकीच्या पद्धतीने म्हटल्यास शारीरिक पीडा व आर्थिक अडचणी उद्भवतात. व नको ती संकटे येतात. मारुतीची स्तोत्रे म्हणताना तर फार जपावे लागते, कसे तरी म्हटल्यास गंभीर दुखणे निर्माण होते. श्रीसुक्त चुकीच्या पद्धतीने म्हटल्यास भयानक आर्थिक समस्या निर्माण होतात. यासाठी सावध राहूनच मंत्र-तंत्र, स्तोत्र पठण व शांती कर्म करावे ते योग्य ठरेल.

 

मेष

 आजची अमावास्या धनस्थानी होत आहे. जर आर्थिक अडचणी असतील तर लक्ष्मीचे  कोणतेही स्तोत्र जास्तीत जास्त वेळा म्हणा. रोकडा अनुभव येईल. कागदोपत्री व्यवहारात चांगले यश मिळेल. कामात यश, किमती वस्तुची खरेदी, विक्री होईल. पूर्वीची काही प्रकरणे निकालात निघतील. त्यामुळे मनशांती मिळेल.


वृषभ

 आजची अमावास्या तुमच्या राशीत होत आहे. प्रति÷sला धोका असेल. आरोग्याच्या तक्रारी असतील तर आज मारुतीचे कोणतेही स्तोत्र वाचा. स्थावर, इस्टेट, वाहन, व्यवहार, धनलाभ, प्रवास, थोरामोठय़ांच्या ओळखी या सर्व बाबतीत चांगले योग कायदेशीर बाबतीत योग्य न्याय मिळेल. सरकारी कामकाजात अपेक्षित यश. नोकरी व्यवसायाच्या प्रयत्नात असाल तर निश्चित यश मिळेल. योग्य प्रयत्न व कष्टाची तयारी मात्र हवी.


मिथुन

आजची अमावास्या फक्त अध्यात्मिक बाबत चांगली आहे. ध्यानधारणा, मंत्रपठण वगैरेत चांगली प्रगती होईल. गुरुचे भ्रमण सर्व बाबतीत अनुकूल असून राजयोगासारखे फळ देईल. आर्थिक बाबतीत चांगला योग आहे. सुप्त कलागुणांना योग्य स्थान मिळेल. कोणत्याही नवीन आर्थिक व्यवहारात तुम्ही जपून वागावे. कुणालाही शब्द आश्वासन, अथवा उधार उसनवार देताना खोलवर विचार करावा लागेल.


कर्क

खरेदी, विक्री, परदेश प्रवास, राजकारण, वास्तुचे व्यवहार यात चांगले यश. आर्थिक बाबतीत लाभदायक योग पण खर्चावर नियंत्रण राहणार नाही. या कालखंडात सर्व बाबतीत सांभाळावे पण विवाहाची बोलणी, वाटाघाटी करताना सावध रहावे लागेल. ‘कथा कुणाची व्यथा कुणा’ या म्हणीचा अनुभव येईल. न होणारे काम होऊन जाईल. अचानक महत्त्वाच्या प्रसंगी नको असलेले पाहुणे येणे, त्यामुळे कामाचा खोळंबा असे प्रकार घडतील.

सिंह

हाती सर्व काही आहे पण त्याचा लाभ मात्र घेता येईलच असे नाही. दूरवरचे प्रवास घडतील. अचानक उद्भवलेला खर्च, मनस्ताप निर्माण करील. महत्त्वाचे पत्रव्यवहार व लिखाणात सावधगिरी बाळगा. मंगळ शत्रू राशीत आहे. त्रास झाला तरी लक्ष्मीयोग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. बुधाचे भ्रमण आर्थिक व्यवहारात बऱयाच महत्त्वाच्या लाभदायक घडामोडी घडवील, पण मानसिक गोंधळ होऊ देऊ नका.


कन्या

आजची अमावास्या भाग्यात होत आहे. नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होईल. नवीन जबाबदारी यशस्वी करून दाखवाल. पुढील काही महिने सुवर्णकाळ समजण्यास हरकत नाही. प्रति÷ा वाढेल. सरकारी नोकरीत असाल तर उच्च पद मिळण्याची शक्मयता. शिक्षणात चांगले यश. आरोग्य उत्तम राहील. कामाचा उरक चांगला व समाधानकारक राहील. राजकारणात असाल तर नेत्रदीपक यश मिळवाल.


तुळ

अष्टमात अमावास्या योगात काही लाभ होऊ शकतात, पण ते कोणत्या मार्गाने होतील ते सांगता येणार नाही. काहीतरी करायला जावून वेगळेच काहीतरी कराल. कारखानदारी, जमीन, जागा, प्लॉट, फ्लॅट, या व्यवहारातून धनलाभाची शक्मयता. हर्षल सप्तमात आहे. कोर्टमॅटर, प्रवास, शत्रूपीडा व अपघातापासून जपावे लागेल. वैवाहिक जीवनात गैरसमाजाला वाव देऊ नका. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेताना काही तरी चुकण्याची शक्मयता आहे.


वृश्चिक

सप्तमात अमावास्या होत आहे. किरकोळ वादावादीचे रुपांतर मोठय़ा प्रकरणात होऊ देऊ नका. खर्च वाढतील. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने कटकटीचे योग. नको त्या ठिकाणी बदली होण्याची असल्याने कुणाच्याही कोणत्याही प्रकरणात गुंतू नका. तसेच शत्रुत्वाला प्रोत्साहन देऊ नका. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी बराच खर्च होईल.


धनु

 अमावास्या षडाष्टकात होत आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत अनुकूल योग. या योगात भव्य दिव्य असे काही तरी घडवाल. धनलाभ, प्रवास, शिक्षण, नोकरी व संततीच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील. वास्तू संदर्भात महत्त्वाच्या घटना, स्वत:चे वाहन, घरदार, पैसा अडका या बाबतीत गुप्तता बाळगणे आवश्यक ठरेल.


मकर

पंचमस्थानी होणारी आजची अमावास्या काही बाबतीत शुभ फळ देणारी आहे.पण कौटुंबिक जीवनात काही तरी गैरसमज निर्माण करण्याची शक्मयता. गुरु दशमात अत्यंत शुभ आहे. एखाद्या कर्तृत्ववान माणसाला योग्य संधी मिळाल्यास तो त्याचे सोने करू शकतो, याचा अनुभव येईल. शनिपीडा सुरू असल्याने काही कामे खोळंबतील. चतुर्थात हर्षल योग वास्तुच्या बाबतीत चमत्कारीक फळे देण्याची शक्मयता आहे. जागा बदल अथवा स्थलांतराचे योगही दिसतात.


कुंभ

चतुर्थातील अमावास्या हा योग बाधिक दोष निवारण्यासाठी चांगला आहे. सर्व कार्यात यश देईल. स्वत:चे कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळेल. मोठय़ा प्रमाणात लाभ होण्याचे योग. वास्तू जागा, वाहन यांची हौस पूर्ण होईल. व्यावसायिक क्षेत्रात तुमचा स्वतंत्र ठसा उमटेल. गुरु शुभ असल्याने सर्व बाबतीत मंगलमय वातावरण निर्माण करील.


मीन

तृतीयात अमावास्या होत आहे. काहीतरी नवे करून दाखविण्याची प्रेरणा मिळेल. धनस्थानी हर्षल असल्याने आर्थिक बाबतीत सावध रहावे लागेल. अचानक नवे खर्च निर्माण होतील. आतापर्यंत अत्यंत अवघड वाटणारी काही कामे पूर्ण होतील. मोठमोठय़ा कामात यश मिळवाल. घरात कुणाचे तरी मंगल कार्य ठरेल.