|Monday, January 21, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत, भय्यू महाराजांचे सर्वांशी मित्रत्व

नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत, भय्यू महाराजांचे सर्वांशी मित्रत्व 

ऑनलाईन टीम / इंदोरः

आध्यात्मकि गुरू भय्यू महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर राजकीय,समाजीक, कला क्षेत्रात या खळबळ उडाली आहे. कारण भय्यू महाराजांचे नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत सर्वांशी घनिष्ठ संबंध होते.

कोण हेते भय्युजी महाराज?

भय्युजी महाराज यांचे मूळ नाव उदयसिंह देशमुख असे होते. वयाची चाळिशी गाठण्यापूर्वीच त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या असा दावा त्यांचे भक्त करत होते. नाथ संप्रदायातील कठोर व्रत आणि दत्तगुरूंना आपले गुरू मानणाऱया भय्युजी महाराजांनी दत्त संप्रदायाची शिकवण त्यांनी आपल्या आचरणातून समाजात रूजवण्याचा प्रयत्न केला.सीयाराम शुटिंगचे ब्रँड अँबेसेडर म्हणूनही त्यांनी सुरूवातीच्या काळात त्यांनी काम केले. भय्युजी महाराज यांना राष्ट्रसंतम्हणून संबोधल जात असे. अध्यात्मकि क्षेत्रात ते प्रसिद्ध आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रीय होते. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठबस होत असे. इंदूरमध्ये त्यांचे मुख्यालय आणि आश्रम आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्युजी महाराजांचे अनुयायी आहेत.

राजकीय क्षेत्रातही त्यांचे योगदान.

भय्युजी महाराज यांनी 2011 साली लोकपाल आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अण्णा हजारेंचे आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने भय्युजी महाराजांनी दूत म्हणून पाठवले होते. तसेच, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सद्भावना उपवास सोडण्यासाठी भय्युजी महाराज यांना बोलावले गेले होते. अध्यात्मकि गुरू भय्युजी महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीने अहमदनगरमधील कोपर्डी इथे बलात्कार पीडित चिमुकलीचे स्मारक बांधण्यात आले होते.

भय्युजी महाराजांवर हल्ला

महाराष्ट्रात मराठा मोर्चे निघत होते त्या काळात भय्युजी महाराज यांच्यावर हल्लेही झाले होते. भय्युजी महाराज यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार त्यांच्या चालकाने 10 मे 2016 रोजी दाखल केली होती. या हल्ल्यामध्ये भय्युजी महाराज सुखरूप होते, तर कारचालक आणि सहकाऱयांना इजा झाली होती. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेश सरकारने भय्युजी महाराजांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊ केला होता. मात्र त्यांनी तो दर्जा नाकारला होता.

Related posts: