|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भिडेंनी एखादा आंबा सरकारला द्यावा!

भिडेंनी एखादा आंबा सरकारला द्यावा! 

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुनील तटकरेंनी उडवली सरकारची खिल्ली

गेल्या 4 वर्षात नुसत्या पोकळ घोषणा

प्रतिनिधी /रत्नागिरी

सरकारला 4 वर्ष झालीत, नुसत्या पोकळ घोषणा, विकास कुठे दिसत नाही. त्यामुळे भिडे गुरूजींनी त्यांच्या बागेतला एखादा आंबा या सरकारला द्यावा, म्हणजे वर्षभरात विकास पैदा झाल्यासारखे होईल, अशी खिल्ली राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उडवली आहे.

सध्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख यांच्या आंब्यावरील वक्तव्याचा विषयावरून सर्वत्र टीकेची झोड उठवण्यात आली आहे. माझ्या शेतातील आंबा खाल्लेल्या जोडप्यांना मुले होतात, अशा भिडे यांनी केलेल्या विधानावर चौफेर टीकेचा भडीमार होत असताना भिडेंच्या विधानाची टेर उडवत तटकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पदवीधर निवडणुकीनिमित्ताने रत्नागिरी दौऱयावर आलेल्या सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात ही टीका केली.

राज्यात आणि केंद्रात महाआघाडीची चर्चा आहे. या महाआघाडीत शिवसेना येणार का, याची चर्चा सुरू असताना तटकरे यांनी यासंदर्भात कुठलीच बोलणी नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रस्ताव देवू, असे म्हटले आहे. पण यासंदर्भातील प्रस्तावाची आम्हीही वाट पहात असल्याचे सूचक विधान तटकरे यांनी केले आहे. शिवसेना हा विभिन्न विचारी पक्ष आहे. त्यामुळे सेनेबरोबर महाआघाडीबाबत चर्चा सुरू असेल, असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार संजय कदम, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, ज्येष्ठ पदाधिकारी कुमार शेटय़े, राजाभाऊ लिमये, बशीर मुर्तूझा उपस्थित होते.

आगामी लोकसभेला अनंत गीतेंविरोधात लढण्यास तयार

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे खासदार तथा पेंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात लढायला नक्की आवडेल, अशी इच्छा सुनील तटकरे यांनी यावेळी प्रकट केली. त्यावेळी गीतेंवर टीकेचा भडीमार केला. संवेदनाशुन्य असलेली माणसं विकास करत नाहीत. याचे प्रतिक म्हणजे अनंत गीते असल्याची खिल्लीही तटकरे यांनी उडवली.

गीतेंनी टीका करण्यासाठी औरंगाबाद निवडलं

औरंगाबादमध्ये अनंत गीते यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा सुनील तटकरे यांनी समाचार घेतला. गीते यांना पाडण्यासाठी कदम यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर गीतेंची माफी मागण्यासाठी रामदास कदम आले होते. या विधानाचा समाचार घेत रामदास कदम एवढय़ा खालच्या पातळीला का आले, असा सवाल तटकरे यांनी केला आहे. तर सेना नेते चंद्रकांत खैरे व रामदास कदम यांच्या वादामुळे गीतेंनी टीका करण्यासाठी औरंगाबाद निवडले असावे, अशी कोपरखळीही तटकरे यांनी यावेळी लगावली.

Related posts: