|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘संवाद’ कार्यक्रमाद्वारे ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ !

‘संवाद’ कार्यक्रमाद्वारे ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ ! 

पद्मश्री पंकज उदास यांचे प्रतिपादन

 

कचऱयाचे सुयोग्य नियोजन घरातूनच केले तरच त्यावर सहज नियंत्रण मिळवता येऊ शकते. म्हणजेच ‘माझा कचरा माझी जबादारी’ हा दृष्टिकोन ठेवून प्रत्येकाने कचरा वर्गीकरणासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. असा सल्ला गजल, सिनेगायक पदमश्री पंकज उदास यांनी मंगळवारी बफहन्मुंबई महानगरपालिका ‘डी’ विभाग कार्यालयाच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन जनजागफती सप्ताहानिमित्त विद्यार्थी व नागरिकांशी ‘संवाद’ या कार्यक्रमात दिला. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष अतुल शहा, सहायक आयुक्त विश्वास मोटे व ग्रीन लावन्स स्कुलचे विद्यार्थी उपस्थित होते.

पंकज उदास यांनी आपल्या सुमधूर आवाजात चिठ्ठी आयी है ! आयी है  चिठ्ठी आयी है! वतन सें  चिठ्ठी आयी है! हे गाणे गाऊन त्यांनी या गाण्याच्या माध्यमातून ‘कचरा आणि प्लास्टिक मुक्त भारत’ करण्यासाठी वतन से चिठ्ठी आयी है! अशा अर्थात विश्लेषण केले. तसेच उपस्थित विद्यार्थी वर्गाला शाळा व तेथील परिसर स्वच्छ ठेवणे ही विद्यार्थी म्हणून आपली जबाबदारी आहे, असा संवाद उदास यांनी विद्यार्थ्यांशी साधला. विद्यार्थ्यांनी आपण कचरा व प्लास्टिकमुक्त भारत यासाठी जनजागफती करणार आणि इतरांनाही करायला लावणार असा संकल्प केला. दरम्यान, ‘क’ कचरा वर्गीकरण, ‘ख’ खत निर्मिती, ‘ग’ गटारांची सफाई आणि ‘घ’ घनकचरा व्यवस्थापन या विषयांवर या कार्यक्रमात संवाद साधण्यात आला असून यावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली.

Related posts: