|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » बीसीसीआय पुरस्कार वितरण उत्साहात

बीसीसीआय पुरस्कार वितरण उत्साहात 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

अफगाणविरुद्ध होणाऱया ऐतिहासिक कसोटीत खेळणार नसला तरी भारतीय कर्णधार विराट कोहली मंगळवारी येथे झालेल्या एमएके पतौडी स्मृती व्याख्यान व बीसीसीआय पुरस्कार वितरण सोहळय़ातील प्रमुख आकर्षणाचे केंद्र बनला होता. त्याला वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा प्रति÷sचा पॉली उम्रिगर करंडक प्रदान करण्यात आला. सलग दोन मोसमासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे.

2016-17 व 2017-18 या दोन मोसमात कोहलीने जबरदस्त कामगिरी केली असल्याने त्याला हा पुरस्कार देण्यात आला. सध्या तो मानेच्या दुखापतीवर उपचार घेत असून यामुळे त्याला कौंटी क्रिकेटमध्ये तसेच अफगाणविरुद्धच्या कसोटीतही खेळता येणार नाही. 15 जून रोजी त्याची येथील राष्ट्रीय अकादमीत फिटनेस चाचणी घेण्यात येणार आहे.

या पुरस्कार वितरण सोहळय़ाला अफगाण संघही उपस्थित होता. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने पतौडी स्मृती व्याख्यान दिले आणि या सोहळय़ासही तो उपस्थित होता. या सोहळय़ासाठी भारताचे आजी-माजी खेळाडू एकत्र आले होते. अंशुमन गायकवाड व सुधा शहा यांना सीके नायुडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीबद्दल जलज सक्सेना, परवेझ रसूल, कृणाल पंडय़ा यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जलज व रसूल यांना रणजीतील सर्वोत्तम अष्टपैलूचा तर कृणालला हजारे वनडे चॅम्पियनशिपमधील कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला. कृणाल पंडय़ा अ संघासमवेत इंग्लंड दौऱयावर असल्याने तो या सोहळय़ास उपस्थित नव्हता.

Related posts: