|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मंगलधाम येथे पुस्तक प्रदर्शन उद्घाटन संपन्न

मंगलधाम येथे पुस्तक प्रदर्शन उद्घाटन संपन्न 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

इचलकरंजी येथील मंगलधाम हॉलमध्ये अभिषेक बुक सेंटर यांच्यामार्फत पुस्तक प्रदर्शन व विक्री चालू झाली तरी आज प्रदर्शनचे उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटन प्रसंगी माणुसकी फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे उपस्थित होते.

तसेच दिनेश मंडल, डायरेक्टर अभिषेक बुक गॅलरी यांनी उपलब्ध असलेल्या विविध पुस्तक संचयाचा परीचय वाचकांना आणि नागरीकांना करून दिला. अनुवादीत, कथा, कादंबरी, लहान मुलांची पुस्तके, ऐतिहासिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयी अशा विविध प्रकारची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच प्रदर्शन महिनाभर चालणार असुन नागरीकांनी याचा लाभ घ्यावा.

कार्यक्रम प्रसंगी उद्घाटन रवी जावळे यांनी केले, तसेच आकाश आलुगडे, अक्षय होगाडे, निहाल पाटील, मच्छिंद्र मोरे, अनुराज यादव, संग्राम नेमिष्टे, मनोज चौगुले, अभिषेक केसरवाने, ओमकार माळी, गणेश आंबलगी, सागर प्रजापती, अरूण लाखे, दिपक मोरे, श्रीकांत लाखे, विनय कोपद, उत्तम तणंगे, अजय ठोकळे, युनूस शेख, अभिद मकानदार, पिंटू मुल्ला, इ. उपस्थित होते.

Related posts: