|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिक्षणाचा वटवृक्ष डॉ.बापूजी साळुखे यांनी रूजविली – प्रा . अशोक पाटील

शिक्षणाचा वटवृक्ष डॉ.बापूजी साळुखे यांनी रूजविली – प्रा . अशोक पाटील 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

येथील दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स ऍण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुखे यांची जन्म शताब्दी वर्षानिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुग्ध वक्ते म्हणून प्रा.अशोक पाटील उपस्थित होते. व्याख्यानामध्ये त्यांनी डॉ.बापूजी साळुखे यांच्या कार्याचा आढावा घेतला . रामपूर सारख्या छोटय़ाश्या खेडे गावात जन्म घेतलेल्या एका सामान्य कुटुंबातील मुलगा शिक्षणाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटून वटवृक्ष करतो. यातून जगाच्या पाठीवर श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विद्यार्थी चमकताना दिसतात. इतकेच नव्हेतर बापूजींनी श्री. स्वामी विवेकानंदांचे विचार तरूण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रूजविण्याचे कार्य केल व ते आजही संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे असे मत प्रा.अशोक पाटील यांनी मानले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सी .आर .पाटील उपस्थित होते . अध्यक्षीय भाषणात त्यांनी बापूजींनी जे शैक्षणिक क्षेत्रात काम केले आहे ते नेत्रदिपक अमे आहे. त्यांनी डी. के. ए. एस. सी. कॉलेजची स्थापना करून इचलकरंजीतील सामान्य जीवन जगण्या-या लोकांच्या मुलांची शिक्षणाची सोय केली. यामुळे सर्वच क्षेत्रात महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकताना दिसतात. याचेच फलत म्हणजे या महविद्यालयास ‘अ’ मानांकन प्राप्त झाले असे मत व्यक्त केले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .डॉ. सुभाष जाधव यांनी केले . सुत्रसंचलन प्रा . एम .एम . कांबळे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील सर्व ज्युनिअर व सिनीअर स्टाफ, प्रशासकीय कर्मचारी, सेवकवर्ग व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आभार प्रा .डी .ए .यादव यांनी मानले.

 

 

 

 

 

Related posts: