|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिराळ्यात भाजपाच्या विरोधात ‘तिरडी’ मोर्चा

शिराळ्यात भाजपाच्या विरोधात ‘तिरडी’ मोर्चा 

काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते मोर्चात सामिल : तहसिलदारांना दिले निवेदन

प्रतिनिधी/ शिराळा

 देशातील सर्वसामान्य जनता उपेक्षीत व दुःखी जीवन जगत आहे. शेती व शेतकरी अडचणीत आहे, एकंदरीत सर्वच क्षेत्रात उदासिनता निर्माण झाली आहे. ही उदासिनता सरकारच्या मारक धोरणांच्यामुळे देशवाशियांच्या नशिबी आलेली आहे. सेवे ऐवजी अडचणी निर्माण करुन शेतकरी व सर्वसामान्य माणसाचे संसार उघडण्यावर आणण्याचा डाव भाजप सरकारचा आहे.  सरकारची ही धोरणे शेतकऱयांच्या संसारावर नांगर फिरविणारी असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केली आहे. तसेच उद्योगपती, सिनेताराकांना भेटून शेतकऱयांचे प्रश्न सुटणार नाहीत. असा आरोप भाजपा सरकारवरती केला.

    शिराळा येथे शिराळा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या महागाई विरोधी काढण्यात आलेल्या तिरडी मोर्चात ते बोलत होते. यावेळी बिऊर ते शिराळा महागाई विरोधी मोटारसायकल रॅली व एस.टी आगार ते तहसिल कार्यालय पर्यंत मोटारसायकल ढकल मोर्चा व पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मोटारसायकल तिरडीवर ठेवून तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी 2500 मोटारसायकली तहसिल कार्यालयावर ढकलत आणून सरकारचा पेट्रोल, डिझेल तर दरवाढीविरोधात निषेध नोंदविण्यात आला.

     यावेळी ज्येष्ठ नेते संपतराव देशमुख, माजी पंचायत समिती सभापती हणमंतराव पाटील, के.डी.पाटील, महादेव कदम, कामेरीचे जयराज पाटील, शिराळा विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष संदीप जाधव, शिराळा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष आनंदराव पाटील प्रमुख उपस्थित होते.

      यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले, भाजप सरकारने सत्तेवर आल्यापासून गेल्या 4 वर्षात कायम शेतकरी विरोधी भूमिका घेतल्या असल्याचे दिसून येते. शेतकयांशी निगडीत असणाया सर्वाचे भाव वाढ करायची आणि दुस्रया बाजूला शेतकयांच्या शेतमालास हमीभाव द्यायचे नाहीत. दर पाडायचे जेणेकरून शेतकरी अडचणीत आला पाहिजे, तो कोलमडून पडला पाहिजे. तो कोलमडून पडला की राजकीय पाळेमोळे रोवता येतील अशी भ्रमक कल्पना या सरकारची दिसून येते. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरवाढीत जगाच्या स्पर्धात भारत अव्वलस्थानी असेल. जनतेमध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणात नाराजी आहे. जनतेचा खदखदनारा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी हे आंदोलन हातात घेतले आहे. सरकारी नोकरभरती थांबविल्याने तरुणांचे नुकसान होत आहे. सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा आहे.

     यावेळी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष संदीप जाधव म्हणाले, सध्या देशात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत सरकारने एकही लोकहिताचा निर्णय घेतलेला नाही. नोटाबंदीने कंबरडे मोडले तोवर कर्जमाफीतही सर्वसामान्यांची मोठय़ा प्रामणात फसवणूक केली. एकंदरीत सर्वच बाजूनीं सर्वसामान्यांना त्रास देवून त्याचे जगणे हतबल करुन सोडावयाचे हा एकमेव उद्योग या सरकारने केलेला आहे. यांच्या अशा धोरणांच्यामुळे महागाई वाढत चालली आहे.

       यावेळी हणमंतराव पाटील म्हणाले, कर्जमाफी हि पूर्णता फसवी आहे. आजपर्यंत या कर्जमाफीचा घोळ कुणालाच सुटलेला नाही. कॉंग्रेस पक्षाने शेतकयांना दिलेली कर्जमाफी हीच ऐतिहासिक कर्जमाफी होती. भाजप सरकार जनतेला अडचणीत आणण्याचे निर्णय घेत आहेत.

    यावेळी संग्रामसिंह पवार, जयराज पाटील, नेर्ले माजी सरपंच जयकर कदम, आनंदराव पाटील, संपतराव देशमुख, सत्यजित पाटील, महादेव कदम, सम्राटसिंह शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत तानाजी कुंभार यांनी केले. तर प्रास्ताविक संभाजी नलवडे यांनी केले. यावेळी पंचायत समिती सभापती मायावती कांबळे, हिंदुराव नांगरे, सुजित देशमुख, बाजीराव पाटील, विकास नांगरे, एन.डी.पवार, श्रीरंग नांगरे, पोपट पाटील, बाजीराव शेडगे, मनोज चिंचोलकर, अँड.रवि पाटील, अभिजित पाटील, सुहास पवार, बाबा पाटील, धनाजी नरुटे, संपत पाटील, भोजराज घोरपडे, राजवर्धन देशमुख, शिवाजी गायकवाड, डॉ.पी.डी.पाटील, अजय जाधव, मोहन पाटील, अशोक पाटील, प्रदीप पाटील, प्रदीप कदम, उत्तम गावडे, बाळासाहेब खोत, प्रा.सम्राटसिंह शिंदे, जयदीप पाटील, ऐतवडे खुर्दचे दत्तात्रय पाटील, देवर्डेचे नाना पाटील, कुरळपचे शिवाजी पाटील, अरुण देवकर, सुभाष पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 

Related posts: