|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शहीद गोसावींचे भव्य स्मारक उभा करा

शहीद गोसावींचे भव्य स्मारक उभा करा 

पंढरपूर / प्रतिनिधी

 भारत भुमीच्या रक्षणार्थ बलिदान दिलेले पंढरीचे वीर सुपूत्र मेजर कुणालगीर गोसावी यांचे पंढरीत भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी महर्षि वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर अभंगराव यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

वीर शहीद मेजर कुणालगीर गोसावी यांनी देशरक्षणार्थ निधडय़ा छातीने वीरमरण पत्करुन असामान्य धाडसाचं व नि:स्सीम देशभक्तीचं र्द्शन दिलं आहे. आमच्या पंढरीच्या या सुपूत्राच्या शौर्यामुळे आम्हा सर्वसामान्य पंढरपूरकरांची मान सन्मानाने उंचावली गेली आहे. शहीद मेजर कुणालगीर गोसावी यांचे भव्य स्मारक जर पंढरीत झाले तर  येथील तरुणाईला त्यांच्या शौर्याची गाथा आठवुन स्फुर्ती चढेल. एक नि:स्सीम देशप्रेमाचं व शौर्याचं हे प्रतीक तरुणाईला सदैव प्रेरणा देत राहीन. पंढरीत लाखोंच्या संख्येने येणार्या विठुरायाच्या भक्तांनाही भुवैकुंठ पंढरीतील  या वीर शहीदपुत्राचं शौर्य दिसून येईल. खर्या अर्थाने पंढरी नगरी ही भक्ती आणि शक्तीचं नगर म्हणून पंढरीच्या सन्मानात एक मानाचा तुरा रोवला जाईल. त्यामुळे पंढरीत शहीद मेजर कुणालगीर गोसावी यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे. अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदन देताना महर्षि वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर भैया देशमुख, महावीर अभंगराव, वैभव डोके, गणेश शिरसट, सुरज राठी, बापु कांबळे, दिनेश अधटराव, सुशांत हेनकेरी आदींसह अनेक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: