|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आष्टय़ात रविवारी ऊस पिक परिसंवादाचे आयोजन

आष्टय़ात रविवारी ऊस पिक परिसंवादाचे आयोजन 

वार्ताहर/ आष्टा

होय आम्ही शेतकरी समुहाच्यावतीने आष्टा येथे रविवार दिनांक 17 रोजी आष्टा येथील व्हेवन हॉलमध्ये आडसाली ऊसपीक चर्चासत्र व आडसाली ऊस परिसंवादाचे आयोजन केले असल्याची माहिती कारंदवाडी येथील प्रगतीशील शेतकरी सुरेश कबाडे यांनी दिली.

सुरेश कबाडे म्हणाले, ऊस पीक म्हणजे सर्वांच्या जिव्हाळयाचा विषय बनला आहे. परंपरागत पध्दतीने शेती करताना ऊस पीकाचे उत्पादन घटनाचे दिसत आहे. नवीन तंत्रज्ञान, योग्य अंतर, मशागत व नियोजनाच्या जोरावर आडसाली ऊसाचे एकरी उत्पादन लक्ष 125 टन ठेवून आपण तिथे पर्यंत पोहचण्यासाठी ऊसपीक चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन केले आहे. वाळव्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी व्हीएसआय पुणेचे माजी शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे, वेदांत ऍग्रोचे शिवाजी थोरात, युनिवर्सल बायो ऑरगॅनिकचे गोविंद डाके, ऍग्रीसर्चचे एरिया मॅनेंजर मनोज शहा, जे.के.रोपवाटीकेचे कैलास माळी उपस्थित राहणार आहेत.

रविवारी सकाळी नऊ वाजता परिसंवादास सुरुवात होणार असून सकाळी दहा वाजता आबासाहेब साळुंखे हे शाश्वत ऊस शेती व आडसाली ऊस नियोजन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 11.30 वाजता प्रबंधक डॉ. ओमप्रकाश हिरे हे आडसाली ऊसाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 12.30 ते 2 या दरम्यान भोजन व्यवस्था व प्रश्न उत्तरे होणार आहेत. दुपारी 2 वाजता डॉ. शिवाजी थोरात यांचे ऊस पीकासाठी सिलीकॉनचे महत्व या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. दुपारी अडीच वाजता प्रयोगशिल शेतकरी प्रबंधक सुरेश कबाडे यांचे एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे माझे प्रयोग या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

दुपारी तिन वाजता डॉ. अंकुश चोरमुले हे किड,रोग,तण व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी पावणे चार वाजता प्रयोगशील शेतकरी विनायक पाटील हे ठिबक सिंचनाचा ऊसामध्ये कार्यक्षम वापर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सव्वा चार वाजता प्रबंधक सुरज चाळके हे आंतर मशागतीसाठी पॉवर ट्रीलरचा वापर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. पाच वाजता शिवार फेरी होणार आहे. संयोजन होय आम्ही शेतकरी समुह, वेदांत ऍग्रो सायन्स टेक्नॉलॉजी,पुणे, युनिवर्सल बायो ऑरगॅनिक ऍण्ड मल्टी ऍग्रो इंडस्ट्रिज, ऍग्रीसर्च(इंडिया) प्रा.लि.नाशिक, जे.के.रोपवाटीका पेठनाका करीत आहेत. या परिसंवादास मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सुरेश कबाडे यांनी केले आहे.

Related posts: