|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवणातील ‘बाबा’चा पर्दाफाश

मालवणातील ‘बाबा’चा पर्दाफाश 

वार्ताहर/ मालवण

जादूटोणा व मांत्रिक विद्येच्या सहाय्याने धनसंपत्ती मिळवून देण्याचा दावा करीत मालवण तालुक्यात अनेकांना गंडा घालणाऱया तुकाराम बाळकृष्ण मेस्त्राr उर्फ महेश पांचाळ बाबा (50, रा. रेवतळे फाटक शाळानजीक) च्या मालवण पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्याच्या घरातच मुसक्या आवळल्या. मेस्त्राrवर भादंवि कलम 420 आणि जादूटोणा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 जून रोजी ‘तरुण भारत’ने ‘मांत्रिक बाबाने अनेक तरुणांना गंडविले’ या मथळय़ाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी तपासाची सुत्रे हाती घेत बाबाच्या कारनाम्याचा पर्दाफाशच केला. तुकाराम मेस्त्राr हा कणकवली तालुक्यात महेश पांचाळ या नावाने परिचीत आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, उपनिरीक्षक श्रीमती आर. व्ही. मोमिन, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश सोनावणे, समीर जंगले, संतोष नाटेकर, आशिष भाबल, आशिष कदम, मंगेश माने आदी सहभागी झाले होते. बाबा मालवणात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घराभोवती पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्या सोबत दोन महिलाही पोलीस स्टेशनमध्ये होत्या. मात्र, पोलिसांकडून फक्त बाबाविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या महिला कोण होत्या? याचा उलगडा झाला नव्हता.

   साळवींच्या तक्रार अर्जाने बाबाचे कारनामे उघड

 तुकाराम मेस्त्राrने मालवण तालुक्यासह जिल्हय़ातील अनेकांना जादूटोण्याच्या बहाण्याने गंडविले आहे. महिन्याभरापूर्वी पोस्ट ऑफिस समोरील आरोही साळवी यांनी तुकाराम मेस्त्राrच्या कारनाम्यांची तक्रार मालवण पोलीस ठाण्यात दिली होती. साळवी यांच्या तक्रारीची दखल घेत मालवण पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी तपासाची सुत्रे फिरविली. त्यानंतर तुकाराम मेस्त्राrकडून फसवणूक झालेल्या मालवण शहरातील अन्य काही नागरिकांनी मालवण पोलीस ठाण्यात धाव घेतली.

 जादूटोण्याचा व्हीडिओ पोलिसांच्या हाती

मेस्त्राr जादूटोणा करीत असल्याचा व्हीडिओ मालवण पोलिसांच्या हाती लागला आहे. या व्हीडिओत तुकाराम मेस्त्राrने जादूटोणाचे साहित्य समोर मांडलेले दिसत आहे. हा व्हीडिओ कोणत्या भागातील आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

 पेंटींग करणाऱया कारागिराला फसविले

दीपक बाळकृष्ण वराडकर या पेंटींग करणाऱया शहरातील कारागिरालाही तुकारामने फसविले. दीपक यांना पेंटींग व्यवसायात आर्थिक यश मिळत नव्हते. पेंटींग व्यवसायात चांगला फायदा व्हावा, यासाठी तुकारामने दीपक यांच्याशी संपर्क साधला. पेंटींग व्यवसायात यश मिळविण्यासाठी दीपक यांच्याकडून दिड महिन्यापूर्वी पाच हजार रुपये तसेच गाडीच्या खर्चासाठी तीन हजार रुपये असे एकूण आठ हजार रुपये घेतले. परंतु पैसे देऊनही व्यवसायात यश आले नसल्याने दीपक यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

आई व मुलीला फसविले

मालवण पोस्ट ऑफिस समोर राहणाऱया आरोही चंद्रकात साळवी यांना त्यांच्या नवऱयाच्या धंद्यात चांगली आर्थिक प्राप्ती करून देण्याच्या बहाण्याने तुकाराम याने त्यांच्याकडून 45 हजार रुपये घेतले. आरोही यांना कोणतीही कल्पना न देता मेस्त्राrने आरोही यांची आई विशाली गिरकर यांच्याशी संपर्क साधला. तुझ्या मुलीला संसारात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांच्याकडून 91 हजार रुपये घेतले.

 चव्हाण कुटुंबियांना फसविले

मेढा येथील कृष्णा वासुदेव चव्हाण यांच्या कुटुंबाला तुकाराम मेस्त्राr याने फसविले आहे. तुकारामने नरेश कृष्णा चव्हाण यांच्याकडून चायनीज धंद्यात यश मिळवून देण्यासाठी 19 हजार रुपये घेतले. चव्हाण यांची पत्नी निकिता चव्हाण यांच्याकडून धंद्यात यश मिळविण्यासाठी व पती-पत्नीतील नातेसंबंध सुधारण्यासाठी 30 हजार रुपये घेतले. तुकारामने चव्हाण यांच्या चायनीज दुकानात बांधण्यासाठी पांढऱया कपडय़ातून काही वस्तू बांधून दिल्या होत्या. कृष्णा चव्हाण यांची मुलगी ममता मसुरकर यांचा नवरा महेश पांडुरंग मसुरकर (46, रा. कळवा मुंबई) हे अनेक दिवस आजारी होते. तुकाराम हा नरेश चव्हाण यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आला होता. यावेळी तुकारामने मसुरकर यांच्यावर स्मशानभूमीत ओवाळणी केल्याचे चव्हाण कुटुंबियांना सांगितले. जावयाला गुण येत नसेल, तर माझ्याकडे ताबडतोब उपचार आहेत, असेही सांगितले. जावयावर उपचार करण्यासाठी कृष्णा चव्हाण यांच्याकडून तुकारामने दोन टप्प्यात 45 हजार रुपये घेतले.

मंगेश पांचाळ बाबाचा दावा

तुकारामने आपण गेली 30 वर्षे कसवण (ता. कणकवली) येथे देवदेवस्कीचे काम करीत असून माझ्याकडे 52 अघोरी विद्या आहेत. मी आजारी माणसांना बरे करू शकतो. कामधंद्यात भरघोस यश मिळवून देऊ शकतो व कौटुंबिक कलह दूर करून कोणाला मारूही शकतो, असे सांगून तक्रारदारांना फसविले आहे. अनि÷ व अघोरी कृत्यांना खतपाणी घालून करणी करू शकतो, माझे ऐकले नाही, तर मूठ मारून, अघोरी विद्या व जादुटोणा करून नातेवाईक व लोकांना भीती दाखवून, धमकी देऊन, फसवणूक करून आपल्याला लुटल्याची तक्रार चव्हाण यांनी पोलिसांत दिली आहे.

बाबाच्या कुटुंबियांची चौकशी करणार

पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी याप्रकरणी बाबाच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. बाबाचा मुलगा गेल्या काही वर्षात श्रीमंतीत खेळू लागला आहे. एक नव्हे, तर दोन लाखाच्या मोटारसायकल, दोन सात ते आठ लाख रुपयांच्या कार, अंगावर लाखो रुपयांचे दागिने असा पेहराव करून हा बाबाचा मुलगा शहरात वावरत असे. बाबाच्या मुलाने म्हणे कुंभारमाठ येथेही बंगला घेतला आहे. त्यामुळे अचानक गरीब असलेला मुलगा श्रीमंत झाला कसा? हे पाहून अनेक युवक त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले. त्यांनीही त्याचा मार्ग पत्करणे पसंत केले. काही महिन्यात श्रीमंती येण्याच्या आशेने अनेकांनी आपल्या घरातील दागिने, कर्जाऊ रक्कम घेऊन त्या बाबाला दिली आहे. आता बाबाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबियांचेही बँक बॅलन्स तपासणे महत्वाचे ठरणार आहे. बाबाच्या खात्यात काहीही नसले, तरी कुटुंबियांकडे लाखो रुपये असल्याची माहिती पुढे येत आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts: