|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विद्या विकास हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप

विद्या विकास हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप 

प्रतिनिधी / सातारा

शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीतील मोळाचा ओढा येथे सुरु असलेल्या देशी दारुच्या दुकानामुळे परिसरातील महिला, मुली, नागरिकांना मद्यपींचा त्रास होत आहे. हे दुकान तातडीने बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी जिल्हाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत मोळाचा ओढा येथे रि. स. नं. 404 या जोर्तिलिंग देवस्थान कोल्हापूर यांच्या जागेत सुभाष विठ्ठलसा पवार यांचे दारुचे दुकान पुन्हा सुरु झाले आहे. हे दुकान सुरु करण्यास शाहूपुरीकरांचा विरोध आहे. हे बिगरशेती जागेत सुरु असून ते सुरु करण्यासाठी देवस्थानच्या कोणत्याही पदाधिकाऱयांनी परवानगी दिलेली नाही तसेच दारुचे दुकान सुरु करण्यास ग्रामपंचायतीने कोणतीही परवानगी दिलेली नाही.

देवस्थानच्या जागेत असलेले हे दुकान महाराष्ट्र शासनाच्या हायवेलगतची दारु दुकाने बंद करण्याच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते. त्यानंतर शाहूपुरी ग्रामपंचायतीने पुन्हा नव्याने दारु दुकान सुरु करण्यास वा जुन्या दुकानास परवानगी न देण्याचा ठराव पास केला होता. याबाबत संबंधित खात्यांनाही कळवण्यात आले होते. तरीही पुन्हा हे देशी दारुचे दुकान सुरु झाल्याने नागरिकांना त्रास होत असून हे दुकान त्वरित बंद करावे, अशी मागणी केली आहे.

यावेळी अमित कुलकर्णी, सिध्दार्थ निकाळजे, नासीर सय्यद, उमेश साळुंखे, भरत परदेशी, नाना जाधव, नरेश परदेशी, पिंटू गोंजारी, आबा इंगळे, धनंजय निकाळजे आदी उपस्थित होते.

 

Related posts: