|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ज्ञानज्योतीचे बुध गावामध्ये जल्लोषात स्वागत

ज्ञानज्योतीचे बुध गावामध्ये जल्लोषात स्वागत 

वार्ताहर/ बुध

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर या संस्थेचे संस्थापक संकल्पक शिक्षण महर्षि प.पू डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे समाधीस्थळ कोल्हापूर येथून आणलेल्या ज्ञानज्योतीचे श्री नागनाथ विद्यामंदीर, बुधमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी प्राचार्य बी. एस. फडतरे, अतुलशेठ फडतरे, प्राचार्या जगदाळे, पर्यवेक्षक मुल्ला, सरपंच अभय राजघाटगे,  ग्रामपंचायत सदस्य गणेश मेळावणे, तात्यासो सातपुते, पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांच्या शुभहस्ते ज्योतीचे पुजन व पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर ज्ञानज्योतीचे व बापूजींच्या प्रतिमेची मिरवणूक संपूर्ण गावातून विद्यालयाच्या ढोल लेझीम पथकाच्या निनादात काढण्यात आली. यावेळी आजी व माजी विद्यार्थ्यांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होते. तसेच या दिवशी गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते. त्यामुळे गावात एकप्रकारे उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी ‘डॉ.बापूजी साळुंखे अमर रहे’ आदी विविध घोषणेने परिसर दणाणून सोडला. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे विद्यार्थी व ग्रामस्त बहुसंख्येने सहभागी झाले होते.

 

Related posts: